छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये मराठा समजाच्या (Maratha Meeting)  समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान दोन गटांत हाणामारी (Sambhaji Nagar Maratha Meeting Clash) झाली आहे. या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे. दोन गटांत ही मारामरी झाल्यांतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


संभाजीनगरच्या बैठकीत नेमकं काय झालं?


संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती. संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जळगाव रोड वरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती. या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या.  


पाहा व्हिडीओ : 



त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या


या बैठकीला आलेल्या एका कार्यकर्त्याने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  9 ऑगस्ट 2016 पासून आम्ही सर्वजण सोबत आहोत. मूक मोर्चा निघाला तेव्हा आम्ही सर्वजण सोबत होतो. मात्र अचाकपणे ते विचारत आहेत की तुम्ही कोण आहात. आम्ही कोण आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही अमुक व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, हे सांगण्यासाठी आलो होतो. मात्र त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या. म्हणूनच मीही त्यांच्या अंगावर गेलो.


एकमताने उमेदवार ठरवण्यासाठी बोलावली होती बैठक


मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोेज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी एक उमेदवार देण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली होती. शहरातील जळगाव रोडच्या मराठा मंदिर या सभागृहात ही बैठक बोलवण्यात आली होती. काकडे नावाच्या समन्वयकाने ही बैठक बोलावली होती. त्यात वेगवेगळी नावे सुचवण्यात आली.  पण विकी राजे पाटील नावाच्या व्यक्तीने यातील काही नावांना विरोध केला आणि नव्या नावाला संधी द्या अशी मागणी केली. यासह या व्यक्तीने आपल्या स्वतःला उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली. येथूनचा वादाला सुरुवात झाली. बाळू औताडे नावाच्या समन्वयकांने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करत विकी पाटील यांना मारहाण केली. नंतर हा वाद वाढत गेला. या बैठकीत उमेदवार ठरला नाही मात्र राडा पहायला मिळाला.