TPEML IPO : IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेला टाटा समूह (Tata Group) आणखी एक IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूह आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीची (Electric Vehicle) लिस्टिंग करण्याच्या तयारीत आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) चा IPO येत्या 12 ते 18 महिन्यांत येऊ शकतो. याद्वारे कंपनी एक ते दोन अब्ज डॉलर्स उभे करू शकते. 


TPEML (Tata Passenger Electric Mobility Limited) ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेईकल (Tata Electric Vehicle) उत्पादन करणारी कंपनी आहे. 2021 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी टाटा समूहाची सर्वात नवीन कंपनी आहे. तसेच टाटा समूहाची ही पहिली कंपनी आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी इक्विटी गुंतवणूक आहे. ही कंपनी Nexon.EV आणि Tiago.EV सारखी बेस्ट सेलर वाहनांची निर्मिती करते.


बिझनेसलाइनच्या एका वृत्तात असं म्हटलं आहे की, टाटा समूह टीपीईएमएलच्या लिस्टिंगची तयारी करत आहे. ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एक अब्ज डॉलर्सचा निधी उभारला होता. अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी फंड टीपीजीने यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली होती. 2026 पर्यंत दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. 


TPEML ला सूचीबद्ध करण्याचा उद्देश टाटा समूहाने बाजारातून पैसे उभारण्याऐवजी त्यांच्या गुंतवणुकीवर कमाई करणे सुनिश्चित करणे आहे. टाटाने यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. परंतु यासाठी आणखी 12 ते 18 महिने लागू शकतात.


ईव्ही मार्केटमध्ये वर्चस्व (Tata Electric Vehicle) 


टीपीईएमएलचा भारतातील ईव्ही मार्केटमध्ये 73 टक्के हिस्सा आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात 53,000 हून अधिक इलेक्ट्रिक व्हेईकल विक्री केली आहे. कंपनीचे व्हॅल्यूएशन 9.5 ते 10 अब्ज डॉलर्स आहे. टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये ईव्हीचा वाटा केवळ 12 टक्के आहे. पण ही कंपनी समूहाच्या डिझेल वाहन व्यवसायाला मागे टाकण्याच्या अगदी जवळ आहे.


टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडकडून भारतातील त्‍यांच्‍या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्‍ही Nexon.ev आणि Tiago.ev च्‍या किमतींमध्ये मोठी कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीकडून किंमतीमध्ये कपात करत ईव्‍ही अधिकाधिक भारतीय ग्राहकांना उपलब्‍ध करून देण्‍याचा मानस आहे. 



  • टाटा कंपनीकडून ईव्ही गाडीच्या किंमती जवळपास 1.2 लाख रुपयांनी कमी केल्या 

  • ग्राहकांना बॅटरीवरील गाड्यांच्या किंमती कमी करत फायदे देण्याचा प्रयत्न 

  • Nexon.ev (465 किमी) ची किंमत आता 11.49 लाख रूपयांपासून सुरुवात 

  • लॉंग रेंज (465 किमी) ची किंमत आता 16.99 लाख रूपयांपासून

  • Tiago.ev ची किंमत आता 7.99 लाख रूपयांपासून


ही बातमी वाचा: