Chamkila : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांचा 'चमकीला' (Chamkila) हा आगामी सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'जब वी मेट','रॉकस्टार' आणि 'लैला मजनू' सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेले इम्तियाज अली यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


'चमकीला' या सिनेमासंदर्भात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. पंजाबचे लोकप्रिय गायक अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 


'चमकीला' ओटीटीवर कधी होणार रिलीज? (Chamkila OTT Release)


इम्तियाज अलीचा 'अमर सिंह चमकीला' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मोशन पोस्टर शेअर करत या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. व्हिडीओ शेअर करत नेटफ्लिक्सने लिहिलं आहे,"माहोल बन जाता था जब वह छेडता था साज, कुछ ऐसा ही था 'चमकीला'का अंदाज". 'चमकीला' हा सिनेमा 12 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. दिलजीत आणि इम्तियाज यांनी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम केलं आहे.






दिलजीत दोसांझ 'चमकीला' सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले,"अमर सिंह चमकीला' यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका रोमांचक कथानकासह मी नेटफ्लिक्ससोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. परिणीती आणि संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा आनंद आहे. एआर रहमान आणि इम्तियाज अली यांचे आभार". 


'चमकीला'चं कथानक काय? 


'चमकीला' या सिनेमात दिलजीत दोसांझ अमह सिंह चमकीला यांची भूमिका साकारणार आहे. तर परिणीती चोप्रा अमरजोत कौरच्या भूमिकेत झळकेल. 'चमकीला' हा सिनेमा अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आता सिनेप्रेमी या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Amar Singh Chamkila Teaser : पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर; दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत