मुंबई : झिरोधाचे सीईओ नितीन कामत (Nithin Kamath) यांना सहा आठवड्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला असल्याचं समोर आलं आहे. याची माहिती आता स्वतः नितीन कामत यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. कमी झोप, थकवा, पाण्याची कमतरता, जास्त व्यायाम, अतिरिक्त कामामुळे हा हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलं. यातून बरे होण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल असंही त्यांनी म्हटलंय.
शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झीरोधाचे सीईओ नितीन कामत यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर चेहरा झुकला होता, लिहिता-वाचण्यातही अडचण येऊ लागल्याचं त्यांनी म्हटलंय. या अपघातातून सावरण्यासाठी आता 3 ते 6 महिने लागू शकतात. नितीन कामत आपल्या फिटनेसला खूप महत्त्व देतात. सोशल मीडियावरही ते या संदर्भात खूप सक्रिय होते. असं असतानाही त्यांना हृदयविकाराचा झटका आ्ल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
डॉक्टरांनी जीवनशैली बदलण्यास सांगितले
नितीन कामत यांनीही या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं असून त्यांनी लिहिलंय की, आपल्या आरोग्याची एवढी काळजी असलेल्या व्यक्तीसोबत असा अपघात होऊ शकतो याचे मला आश्चर्य वाटते. या घटनेमुळे आपण काहीसे खचलो आहे, पण लवकरच चालायला आणि धावायला लागेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
डॉक्टरांनी नितीन कामत यांना आता त्यांच्या जीवनशैलीत बदल करावे लागतील असे सांगितले आहे.
नितीन कामतच्या या पोस्टवर भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी लिहिले की, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कदाचित तुमच्या वडिलांच्या जाण्याने तुम्हाला त्रास झाला असेल. माझ्या बाबतीतही असेच घडले. तुम्ही ब्रेक घ्या.
कॅपिटलमाइंडचे सीईओ दीपक शेनॉय म्हणाले की, तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे. लवकरच भेटू निरोगी आणि हसत. याशिवाय अनेकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ही बातमी वाचा :