मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अस्थिरतेतून भारतीय शेअर बाजार बाहेर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्यामुळे अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यानदेखील अनेक आयपीओ आले. आता निवडणूक संपली असून आणखी काही आयपीओ येणार आहेत. आगामी आठवड्यात एकूण तीन आयपीओ खुले होणार आहेत. हे तिन्ही आयपीओ साधारण एक हजार कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये डीईई पाइपिंग सिस्टम्स (DEE Piping Systems), आसान लोन्स (Aasaan Loans) आणि स्टेनली लाईफस्टाईल्स (Stanley Lifestyles) या तीन आयपीओंचा समावेश आहे. 


डीईई पाइपिंग सिस्टम्स आयपीओ (DEE Piping Systems)


डीईई पाइपिंग सिस्टम्स (DEE Development Engineers Limited) या कंपनीचा आयोपीओ एखूण 418.01 कोटी रुपयांचा आहे. कंपनी यातील 325 कोटी रुपयांचे 1.6 करोड़ फ्रेश शेअर जारी करणार आहे. तर 93.01 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल असेल. येत्या 19 जून रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओत 21 जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर लिस्ट होणार आहे. आयपीओत गुंतवण्यासाठी कंपनीने 193 ते 203 रुपयांचा किंमत पट्टा ठेवलेला आहे. तुम्हाला या आयपीओत पैसे गुंतवायचे असतील तर कमीत कमी 14,819 रुपये गुंतवावे लागतील.  


आसान लोन आयपीओ (Aasaan Loans)


आसान लोन (Akme Fintrade India Ltd) या कंपनीचा आयोपीओ हा 132 कोटी रुपयांचा आहे. ही कंपनी 1.1 कोटी फ्रेश शेअर जारी करणार आहे. हा आयपीओ 19 जून रोजी खुला होणार असून 21 जूनपर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक केल्यानंतर शेअर्स 24 जून रोजी वितरित केले जातील. हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर 26 जून रोजी लिस्ट होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा  114 ते 120 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आला आहे. या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 125 शेअर्स खरेदी करावे लागतील. म्हणजेच तुमच्याकडे कमीत कमी 15,000 रुपये असणे गरजेचे आहे. 


स्टेनली लाईफस्टाईल्स आयपीओ (Stanley Lifestyles)


स्टेनली लाईफस्टाईल्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ एकूण 537.02 कोटी रुपयांचा असेल. या कंपनीमार्फत 200 कोटी रुपयांचे 54 लाख फ्रेश शेअर्स वितरित केले जाणार  असून 337.02 कोटी रुपयांचे 91 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलसाठी असतील. हा आयपीओ येत्या 21 जून ते 25 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. 26 जून रोजी हे शेअर्स गुंतवणूकदारांना वितरित केले जातील. तर हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर येत्या 28 जून रोजी सूचिबद्ध होईल. या आयपीओचा किंमत पट्टा  351 ते 369 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 40 शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच तुमच्याकडे कमीत कमी 14,760 रुपये असणए गरजेचे आहे. 


हेही वाचा :


EPFO चा मोठा निर्णय, आता खातेधारकांना पैसे काढणे होणार अवघड!


SBI कडून MCLR रेटमध्ये वाढ, होम लोन, कार लोनचा हफ्ता वाढणार; सामान्यांना झटका!


ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!