MHT CET Result 2024 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा राज्यात 22 एप्रिल ते 16 मे यादरम्यान घेण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. 


सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org  या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.


असा पाहा MHT CET 2024 रिझल्ट? MHT CET 2024 Result Live Updates: How to check results


निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या 


cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर  portal links यावर क्लिक करा


त्यानंतर Check MHT CET Result 2023  या लिंकवर क्लिक करा


रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा


रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा  


Step 1: Visit the official website— cetcell.mahacet.org, mahacet.in and mahacet.org


Step 2: Click on the result link given on the website


Step 3: Enter your credentials such as application number, date of birth and security pin


Step 4: View and download the results for future reference


एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत 


शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी दोन सत्रात घेण्यात आली. 22 ते 30 एप्रिल 2024 रोजी पीसीबी गटाची परीक्षा घेण्यात आली होती. पीसीएम गटाची परीक्षा 2 मे ते 16 मे 2024 दरम्यान घेण्यात आली होती.


प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे (Admission Process)


प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे  बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा.  प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI