मुंबई : नोकरदार वर्गाला भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) स्थापन करण्यात आली. नोकरदार वर्ग प्रतिमहिन्याला आपल्या पगारातील एक निश्चित रक्कम ईपीएफओमध्ये पीएफ म्हणून जमा करतो. नंतर जमा केलेली हीच रक्कम खातेदाराला पेन्शन म्हणून दिले जाते. आणीबाणीच्या काळात याच पीएफ खात्यातील रक्कम वापरता येत असे. मात्र आता ईपीएफओने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर आता पीएफ खातेदाराला पैसे काढण्यासाठी अडचणी येऊ शकतात.


75 टक्के रक्कम काढण्याची सुविधा


एखाद्या विशिष्ट स्थितीत ईपीएफओ खात्यातून पैसे काढता येतात. हे पैसे काढण्यासाठी वेगळे नियम आहेत. अशाच नियमांअतर्गत ईपीएफओने खातेदारांना पैसे काढण्यासाठी एक खास सोय करून दिली होती. पण ही सोय आता तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आळी आहे. मुळात कोरोना महासाथ लक्षात घेता खातेदाराला आर्थिक अडचण भासू नये यासाठी पीएफमधील 75 टक्के रक्कम काढण्याची सुविधा ईपीएफओने उपलब्ध करून दिली होती. या पैशांच्या माध्यमातून कोरोना महासाथीत उपचार करता येत होते. मात्र आता ही सोय ईपीएफओने बंद केली आहे.


कोविड-19 अॅडव्हान्स फॅसिलिटी झाली बंद


ईपीएफओने ‘कोविड-19 अॅडव्हान्स फॅसिलिटी’ला तत्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स सिस्टिम होती. 2021 साली कोरोना महासाथीच्या काळात या सुविधेत आणखी सुधारणा करण्याात आली होती. मात्र आता ही सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आता कोरोना महासाथ संपलेली आहे. त्यामुळे कोविड-19 अॅडव्हान्स फॅसिलिटी बंद करण्यात आली आहे. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे, असे ईपीएफओने सांगितले आहे.


ईपीएफओची सुविधा काय होती?


ईपीएफओच्या या सुविधेमुळे कोरोना महासाथीच्या काळात अनेकांना फायदा झाला. या पैशांतून ईपीएफओ खातेदारांनी करोनाग्रस्त कुटुंबीयांवर उपचार केले. करोना महासाथीच्या काळात ज्या लोकांना रोजगार गमवावा लागला, त्यांनादेखील या सुविधेचा फायदा झाला. या सुविधेअंतर्गत ईपीएफओ तीन महिन्यांचा पगार (मूळ वेतन आणि महागाई भत्ता) किंवा खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम यामध्ये जी कमी असेल ती रक्कम खातेदाराला दिली जायची. विशेष म्हणजे ही रक्कम पीएफ खात्यात जमा करण्याचीही गरज नव्हती. 


हेही वाचा :


ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!


SBI कडून MCLR रेटमध्ये वाढ, होम लोन, कार लोनचा हफ्ता वाढणार; सामान्यांना झटका!


बापरे बाप! एलॉन मस्क यांचा थक्क करणारा पगार; आकडा वाचून चकित व्हाल