मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा दिला होता. मात्र भारतीय स्टेट बँक (एसबीआय) या सरकारी बँकेने तिच्या ग्राहकांना झटका दिला आहे. या बँकाने नुकतेच मार्जनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (एसीएलआर) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता एसबीआय या बँकेचे कर्ज महागणार आहे. परिणामी गृहकर्ज, कार खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज इत्यादी कर्जाचे इएमआय वाढणार आहेत.
दहा बेसिस पॉइंट्सने वाढवला एमसीएलआर दर (RBI increases MCLR rate)
आरबीआयने आपला 6.5 हा रेपो रेट कायम ठेवलेला आहे. रेपो रेट वाढला असता तर वेगवेगळ्या कर्जाचा ईएमआय वाढला असता. या निर्णयामुळे कर्जदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता एसबीआयने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या निर्णयामुळे एमसीएलआरवर आधारित कर्ज महागणार आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यावर ईएमआयचे ओझेही वाढणार आहे.
एमसीएलआरमध्ये नेमकी किती वाढ झाली?
एसबीआयने एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी अगोदर एमसीएलआर दर 8.65 टक्के होता. आथा हाच दर 8.75 टक्के करण्यात आला आहे. 1 ते 3 महिन्यांचा एमसीएलआर दर 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्के करण्यात आला आहे. 6 महिन्यांचा एमसीएलआर दर 8.55 टक्क्यांवर 8.65 टक्के वाढवण्यात आला आहे. तर 2 वर्षे मुदतीचा एमसीएलआर दर 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के करण्यात आळा आहे. तीन वर्षांचा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आला आहे.
एमसीएलआर म्हणजे नेमकं काय? (What is MCLR)
एमसीएलआर आर हा एका प्रकारचा व्याजदर आहे. याच एमसीएलआरच्या आधारावर बँका ग्राहकांना कार लोन, होम लोन देतात. रेपो रेटशी लिंक असलेल्या कर्जावर एमसीएलआर वाढीचा काहीही परिणाम होत नाही.
हेही वाचा :
बापरे बाप! एलॉन मस्क यांचा थक्क करणारा पगार; आकडा वाचून चकित व्हाल
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे काय? जाणून घ्या...
ITR Filing : आयटीआर भरण्याआधी 'हे' काम आवर्जून करा, अन्यथा ऐनवेळी येऊ शकते अडचण!