Vehicle Sales Report: देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मे 2022 मध्ये वार्षिक कार विक्री 185 टक्क्यांनी (YoY) वाढून 2,51,052 युनिटची विक्री झाली आहे. तर मे 2021 मध्ये प्रवासी वाहनांच्या 88,045 युनिट्सची विक्री झाली होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या उद्योग संघटनेच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मे 2019 च्या 2,26,975 युनिट्सच्या तुलनेत मे 2022 मध्ये 2,51,052 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. असं असलं तरी प्रवासी वाहनांची विक्री अद्याप 2018 मध्ये झालेल्या वाहन विक्रीच्या तुलनेत कमी आहे. 


यातच तीन चाकी वाहनांची विक्री मे 2021 मध्ये 1,262 युनिट्सच्या तुलनेत मे 2022 मध्ये अनेक पटींनी वाढून 28,542 युनिट्स झाली. मे 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 3,54,824 युनिटच्या तुलनेत दुचाकींची विक्री 253 टक्क्यांनी वाढून 1,253,187 युनिट्स झाली आहे.


तीन चाकी आणि दुचाकींची विक्री अजूनही मे 2019 ची कोरोना महामारीपूर्व विक्रीची पातळी ओलांडू शकलेली नाही. मे 2022 मध्ये 28,542 तीन चाकी वाहनांची विक्री झाली होती, तर मे 2019 मध्ये 51,650 युनिटची विक्री झाली होती. मे 2022 मध्ये तीनचाकी वाहनांच्या 1,253,187 युनिट्सची विक्री झाली, तर 2019 मध्ये 1,725,204 युनिटची विक्री झाली.


भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने मे 2022 मध्ये एकूण 1,532,809 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ऑटो उद्योगाने एप्रिल 2019 मध्ये विकल्या गेलेल्या 2,004,137 युनिट्सची कोरोना महामारीपूर्व पातळी अद्याप ओलांडलेली नाही. मे 2020 मध्ये विकल्या गेलेल्या 444,131 युनिट्सच्या तुलनेत या वर्षभरात 245 टक्के वाढ नोंदवली आहे.


सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, “मे 2022 मध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री मंदावली आहे. कारण ती अनुक्रमे 9 वर्षे आणि 14 वर्षांपूर्वीच्या तुलनेत अगदी कमी आहेत. प्रवासी वाहन विभागातील विक्री सध्या 2018 च्या पातळीच्या खाली आहे." दरम्यान, वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने 502,703 प्रवासी वाहने, 49,480 तीन चाकी आणि 2,415,769 दुचाकी विकल्या आहेत. 2022 मध्ये विकल्या गेलेल्या युनिट्सची संख्या सध्या 2,968,006 आहे. यात  एप्रिल-मे 2021 दरम्यान विकल्या गेलेल्या 1,717,839 युनिट्सपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI