एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भारतात जनरल आणि स्लीपर कोचने रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? गेल्या सात महिन्यांचा अहवाल समोर

देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान, त्यांच्या आरामासाठी एसी कोचपासून ते इतर सुविधांपर्यंत विविध सुविधा रेल्वे पुरवते.

Indian Railway: भारतात रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. या प्रवासादरम्यान, त्यांच्या आरामासाठी एसी कोचपासून ते इतर सुविधांपर्यंत विविध सुविधा रेल्वे पुरवते. अशातच आता एक अहवाल आला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, देशात वातानुकूलित डब्याऐवजी रेल्वे प्रवासी जनरल डब्यातून किंवा स्लीपरमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या सात महिन्यांत एकूण रेल्वे प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी नॉन-एसी कोचमधून प्रवास केला आहे. फक्त 4.7 टक्के प्रवाशांनी एसी कोच निवडले आहेत.

भारतीय रेल्वेने दिली ही माहिती 

भारतीय रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशातील एकूण 390.2 कोटी रेल्वे प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास केला आहे. केवळ 4.7 टक्के प्रवाशांनी एसी वर्ग (वातानुकूलित) डब्यातून प्रवास केला. रेल्वेच्या वतीने अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सामान्य आणि स्लीपर श्रेणीतील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

372 कोटी प्रवाशांनी नॉन-एसी डब्यातून प्रवास केला

यावर्षी, या सात महिन्यांत (एप्रिल ते ऑक्टोबर) एकूण 390.2 कोटी प्रवाशांनी वेगवेगळ्या रेल्वे वर्गांमध्ये प्रवास केला आहे. जो 2022 च्या याच कालावधीतील 349.1 कोटी प्रवाशांपेक्षा 41.1 कोटी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या 7 महिन्यांतील एकूण संख्येपेक्षा हे प्रमाण 11.7 टक्के अधिक आहे. रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 390.2 कोटी प्रवाशांपैकी 372 कोटी प्रवाशांनी नॉन-एसी डब्यांमध्ये प्रवास केला तर उर्वरित 18.2 कोटी प्रवाशांनी एसी डब्यांमध्ये प्रवास केला.

95  टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी नॉन-एसी डबे निवडले

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, एप्रिल ते ऑक्टोबर 2023 दरम्यान रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी जनरल आणि स्लीपर क्लासमधून प्रवास केला. फक्त 4.7 टक्के प्रवाशांनी एसी क्लास निवडला.

कोविड कालावधीच्या तुलनेत आज दररोज 562 अधिक ट्रेन धावतात 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्री-कोविड दिवसांच्या तुलनेत आता दररोज 562 अधिक ट्रेन धावतात. कोविड संकटाच्या काळात दररोज 10,186 ट्रेन धावत होत्या. परंतु आता ती 10,748 पर्यंत वाढली आहे. 

दरम्यान, रेल्वेच्या एसी डब्यांचे भाडे जास्त असल्यानं रेल्वे प्रवाशांनी नॉन एसी डब्यातून प्रवास करणे पसंत केले आहे. दुसरे कारण असे असू शकते की भारतीय गाड्यांमध्ये एसी कोचची संख्या कमी आणि जनरल डब्यांची संख्या जास्त आहे. एसी डब्यांची संख्या कमी असल्यानं येथील जागांची संख्याही कमी होते.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Railway Station : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार पाच रुपयात लीटरभर पाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report - Priyanka Gandhi : लोकसभेत पुन्हा परतली 'इंदिरा..';  प्रियांका गांधींचा शपथविधीCM Eknath Shinde FULL PC :  महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदेDevendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारTop 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या  Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Maharashtra CM Devendra Fadnavis: आता डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?
डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
Embed widget