Bank Holiday Election: उद्या (19 एप्रिल) देशातील काही राज्यांमध्ये लोकसभेसाठी (Loksabha) पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा उद्या आहे. या पार्श्वभूमीवर बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्या काही राज्यामध्ये बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी यादी तपासूनच घराच्या बाहेर पडा. महत्वाचं काही काम असेल तर आजच पूर्ण करा.
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण देशातील काही राज्यामध्ये उद्या बँका बंद राहणार आहेत. उद्या काही राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ज्या शहारत निवडणूक होणार आहे, त्या ठिकाणच्या बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं उद्या बँकांशी संबंधित कामं रखडण्याची शक्यता आहे. उद्या सरकारी आणि खासगी कार्यालयांना देखील सु्ट्ट्ी देण्यात आली आहे.
कोण कोणत्या शहरात बँका राहणार बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अनेक राज्यात बँका बंद राहणार आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेश, कन्न्याकुमारी, उत्तराखंड, आसाम आणि नागालँड तसेच डेहराडून, चेन्नई, इटानगर, जयपूर, कोहिमा, नागपूर आणि शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही यादी तपासणे गरजेचे आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुडुच्चेरी अंदमान आणि निकोबार तसेच महाराष्ट्रातील विदर्भात निवडणुका होत आहेत. मात्र, या भागात सुट्टीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मतदान
उद्या देशात पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि नागपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतादरसंघातील प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्या आहेत. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळं आता जनता नेमकं कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकणार हे आपल्याला 4 जूनला समजणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या: