Solapur Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशातच सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha Election) दाखल केलेल्या दोन उमेदवारांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्या आहेत. सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satput) आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या आहेत.  


राहुल गायकवाड यांनी दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराला पत्राद्वारे कळवले आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जतील एका पानावर स्वाक्षरी राहिली होती. अर्जाच्या छाननीपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना वेळ देण्यात आला आहे. 


सोलापूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान


उद्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं. दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. अशातच भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या आहेत. तसेच वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्या अर्जात देखील त्रुटी आढळल्या आहेत. मात्र, या दोन्ही उमेदवारांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वेळ देण्यात आलाय. 


सोलापूर लोकसभा मतदारसंघातील फाईट तगडी


सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील फाईट तगडी समजली जात आहे. गेल्या दोन टर्मपासून म्हणजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार विजयी झाला आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा या मतदारसंघातून दोन वेळा परभाव झाला आहे. 2014 साली शरद बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला होता. तर दुसऱ्या वेळेत म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जय सिद्धेश्वर महाराज यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, आजा सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यावेळी काँग्रेसनं प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राम सातपुतेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोलापूर थोडं कठीण, माढा जिंकणं आमच्यासाठी जास्त कठीण; भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या कबुलीनंतर सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली