Black Tuesday on Wall Street : सध्या जागतिक पातळीवर रुपयाची ( Indian Rupee ) घसरण सुरु आहे. येत्या काळात जागतिक महामंदी ( Great Depression ) शक्यताही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच आजच्या दिवशी इतिहासात एक वेगळी नोंद आहे. आज 'ब्लॅक ट्यूसडे' ( Black Tuesday ) आहे. 29 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत शेअर बाजार विक्रमी अंकानी कोसळला होता. 93 वर्षांपूर्वी म्हणजे 1929 साली न्यूयॉर्क वॉल स्ट्रीटमध्ये ( Wall Street ) म्हणजे अमेरिकन शेअर बाजारात ( Wall Street Black Tuesday ) मोठी पडझड झाली होती. यामुळे जागतिक आर्थिक महामंदी ( Great Depression ) आली होती. म्हणून या दिवसाचा 'ब्लॅक ट्यूसडे'  ( Black Tuesday ) म्हणजे काळा मंगळवार म्हणून केला जातो. याचा फटका जगातील अनेक विकसित देशांना बसला होता.


29 ऑक्टोबर 'ब्लॅक ट्यूसडे' 


29 ऑक्टोबर 1929 रोजी युनायटेड स्टेट्समधील स्टॉक एक्सचेंज ( Wall Street ) म्हणजे अमेरिकन शेअर मार्केट कोसळलं होतं. या एकाच दिवसात शेअर बाजार विक्रमी 12 टक्क्यांनी घसरल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. या प्रचंड नुकसानीचा परिणाम अनेक लोकांना आणि देशांना सहन करावा लागला होता. या विक्रमी पडझडीमुळे घटनांचे चक्र सुरु झाले आणि जागतिक मंदी आली. जागतिक मंदीच्या 10 वर्षांमध्ये सर्व विकसित देशांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.


1920 दशक समृद्धीचा काळ


अमेरिकेमध्ये 1920 दशकाचा काळ हा समृद्धीचा आणि संपत्तीचा काळ होता. शेअर बाजारात मोठा नफा पाहायला मिळत होता. मोठ्या गुंतवणुकीमुळे गुतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत होतं. अनेक गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहील आणि आणखी नफा मिळेल असा विश्वास वाटत होता. त्यामुळे लोकांनी भांडवल उधार घेऊन अधिक स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. 


दरम्यान, 20 व्या दशकाच्या शेवटी रिअल इस्टेटच्या किमती वेगाने घसरल्या परिणामी शेअर बाजारात घसरणीला सुरुवात झाली. नुकसानीच्या भीतीमुळे लोकांनी हाती असलेले स्टॉक विकायला सुरुवात केली. यावेळी लोकांनी शेअरच्या किमती खूप कमी होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात 'पॅनिक सेलिंग' ( नुकसानीच्या भीतीने शेअर्स विक्री ) परिणाम शेअर बाजार आणखीनच कोसळला. 29 ऑक्टोबरला शेअरच्या किमती घसरायला लागल्यावर सर्वात विक्रमी घसरणीची नोंद झाली. शेअर बाजार 10 टक्क्यांहून अधिक अंकांनी कोसळला होता.


आर्थिक मंदीचं कारण काय?


1920 च्या दशकात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठी गती मिळाली होती. 1920 ते1928 या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने वाढली. शेअर्सच्या किमती वेगाने वाढल्या. लोक कोणताही अभ्यास न करता किंवा माहिती न घेता शेअर बाजारात अधिक पैसे गुंतवत होते. कंपन्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला, त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं. रेडिओ, फ्रीज, वॉशिंग मशिन यांसारख्या उपकरणांचा वापर प्रचंड वाढला. दर दोन वर्षांनी या उत्पादनांची विक्री दुप्पट होऊ लागली. अनेकांनी शेअर बाजारात पैसे टाकल्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे भाव आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले होते.


1929 साली सुरुवातीला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. लोकांची नोकरी जाऊ लागली. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली. तरीही लोक शेअर बाजारात पैसे गुंतवत होते. 1927 ते 1929 या दोन वर्षांमध्ये शेअर्सची किंमत दुप्पट झाली होती. 


भरमसाठ नफा कमावल्यानंतर लोकांना नुकसानीची भीती वाटू लागली. त्यामुळे लोकांना बाजारात पैसे गुंतवणे बंद केले. परिणामी कंपन्यांना मिळणारी गुंतवणूक कमी झाली. उत्पादन घटल्यामुळे कंपन्यांना नुकसान सहन करावं लागलं आणि शेअर्सची किंमत घसरली. 24 ऑक्टोबर पासून शेअर बाजार घसरण्यास सुरुवात झाली. 29 ऑक्टोबराला बाजार विक्रमी अंकांनी घसरला.


जगाचा जीडीपी 15 टक्क्यांनी घसरला


29 ऑक्टोबर रोजी जागतिक महामंदीला सुरुवात झाली. या आर्थिक महामंदीतून सावरायला जगाला 10 वर्षाचा कालावधी लागला. 1929 साली सुरु झालेली आर्थिक महामंदी 1939 पर्यंत होती. या दहा वर्षांच्या काळात जगाचा जीडीपी (Gross domestic product) 15 टक्क्यांनी घसरला होता. 1929 साली सुरु झालेल्या या आर्थिक मंदीचा फटका गरीब असो वा श्रीमंत सर्वांनाच बसला. उत्पादन घटलं, टॅक्स परतावा घडला, कंपन्यांचा नफाही घटला यामुळे बेरोजगारीचं प्रमाणंही वाढलं होतं. तसेच या आर्थिक मंदीत झालेल्या नुकसानामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचंही बोललं जातं.