Vishvas Swaroopam Shiva Statue : राजस्थानमध्ये (Rajsthan) भगवान शंकराच्या (Lord Shiva) 369 फुटी उंच मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. भगवान शंकराची ही प्रतिकृती जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या उंच शिवप्रतिमेला ‘विश्वास स्वरूपम’ नाव देण्यात आलं आहे. 'विश्वास स्वरूपम' प्रतिमेचं लोकार्पण आज होणार आहे. हा कार्यक्रम 29 ऑक्टोबरपासून 06 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या भव्य मूर्ती लोकार्पणाचा कार्यक्रम प्रसिद्ध कथावाचक मुरारी बापू, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसरात नऊ दिवस मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे.


जगातील सर्वात उंच 369 शिवमूर्ती


राजस्थानमध्ये 369 फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे आज लोकार्पण होणार आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात ही भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीला 'विश्वास स्वरूपम' असं संबोधलं जात आहे. नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. 2012 साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे.


मूर्तीचे तयार होण्यासाठी लागली 10 वर्षे


या भव्य मूर्तीमध्ये लिफ्ट, जिने, हॉल बांधण्यात आला आहे. या मूर्तीचे काम पूर्ण होण्यासाठी 10 वर्षे लागली. यासाठी 3000 टन स्टील आणि लोखंड तसेच 2.5 लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे. ऑगस्ट 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुरारी बापू यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर आता या मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. नाथद्वारामधील 'विश्वास स्वरूपम' मूर्तीचं हे ठिकाण उदयपूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे.


जगातील सर्वात उंच शिवमूर्ती विश्वास स्वरूपमचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा


संत कृपा सनातन संस्थान द्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीचं बांधकाम ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कंपनीने मिळून केलं आहे. या मूर्तीमध्ये चार लिफ्ट आहेत. या लिफ्टच्या साहाय्याने तुम्ही 270 फुट उंचीवर शंकराच्या डाव्या खांद्यावरील त्रिशूळवरून पाहता येईल.  369 फुट उंट या मूर्तीमध्ये एका वेळी सुमारे 10 हजार लोक राहू शकतात. 


जगातील सर्वात उंच पाच शिवमूर्ती



  • विश्वास स्वरूपम, राजस्थान : 369 फुट

  • कैलाशनाथ महादेव मंदिर, नेपाल : 143 मीटर

  • मरूद्वेश्वर मंदिर, कर्नाटक : 123 मीटर

  • आदियोग मंदिर, तमिळनाडू : 112 मीटर

  • मंगल महादेव, मॉरीशस : 108 मीटर