Share Market : शेअर बाजारात योग्य गुंतवणूक (Stock Market) आणि योग्य वेळ अतिशय महत्त्वाची  असल्याचे म्हटले जाते. टाटा समूहातील (Tata Group) एका कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. कधी काळी 3 रुपयांचा असणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना टाटा समूहातील 'टायटन'  कंपनीचा (Titan) शेअर दर 3300 रुपयांहून अधिक झाला. टायटनच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3435 रुपये आहे. तर, 52 आठवड्यातील नीचांक 2269.60 रुपये इतका आहे. 


शेअर दरात मोठी उसळण 


टायटनच्या शेअर दरात मागील 20 वर्षात मोठी तेजी दिसून आली आहे. 25 जुलै 2003 रोजी टायटनचा शेअर दर 3.03 रुपये इतका होता. आता, 24 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचा शेअर दर 3398.40 रुपये इतका झाला आहे. मागील 20 वर्षाच्या काळात 112058 टक्क्यांची उसळण दिसून आली आहे. 


जर एखाद्या व्यक्तीने 25 जुलै 2003 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूक कायम ठेवली असती, तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य 11.21 कोटी रुपये झाले असते. आम्ही आमच्या गणनेत 1:1 च्या प्रमाणात टायटनने दिलेले बोनस शेअर्स समाविष्ट केलेले नाहीत. कंपनीने जून 2011 मध्ये हे बोनस शेअर्स दिले होते.


झुनझुनवालांचा टायटनवर मोठा डाव 


दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा टायटन ही आवडती स्टॉक कंपनी आहे. राकेश झुनझुनवाला यांनी टायटनवर मोठा डाव लावला होता. राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आता टायटनचे 47695970 शेअर्स किंवा कंपनीतील 5.37 टक्क्यांची मालकी आहे. मागील पाच वर्षात टायटनच्या शेअर्समध्ये 267 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 927.10 रुपयांवरून 3398.40 रुपयांपर्यंत वाढले आहेत. 


(Disclaimer : ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांना, आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा.)


इतर महत्त्वाच्या बातम्या :