Banking Details In Mobile राज्यात सध्या मोबाईल (Mobile) चोरांनी धुमाकूळ घालता आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपले महत्वाचे डिटेल्स असतात त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅंक डिटेल्सदेखील असतात. आजकाल अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंट करत आहेत. स्मार्टफोन चोरांना हे वॉलेट अॅक्सेस करणे तितकं अवघड नाही. त्यामुळे सावध गिरी बाळगणे अत्यंत गरजेचे ठरते. जर तुमचा फोन हरवला असेल तर अशा वेळी तुम्ही तुमचा फोन किंवा त्याच्या डेटाचा  गैरवापर होण्यापासून रोखू शकता. फोन हरवल्यावर सर्वांत आधी काय कराल म्हणजे तुमचा खिसा खाली होणार नाही, पाहूयात...



तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा...



सर्वप्रथम फोन हरवल्यावर फोन नंबरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. सिमकार्ड ब्लॉक करणे म्हणजे ओटीपीद्वारे अॅक्सेस करता येणारे फोनमधील प्रत्येक अॅप ब्लॉक होईल. नवीन सिमकार्डवर तुम्ही नेहमी तोच जुना नंबर मिळवू शकता. यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु आपली सुरक्षा आणि मोबाइल वॉलेट अधिक महत्वाचे आहे.



मोबाइल बँकिंग सेवा बंद करा...


फोन चोर तुमची बँक डिटेल्स सहज अॅक्सेस करू शकतात, त्यामुळे त्यावेळी बँक सेवा बंद करणं खूप गरजेचं आहे. तुमचे सिमकार्ड आणि मोबाईल अॅप एकत्र काम करत असतात, कारण नोंदणीकृत नंबरवर ओटीपीशिवाय कोणतेही ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे फोन हरवताच किंवा चोरीला जाताच दोन्ही ब्लॉक करावेत.


यूपीआय पेमेंट बंद करा...


यूपीआय पेमेंट बंद करायला झालेला थोडा उशीर तुम्हाला महागात पडू शकतो. एकदा आपण फोन चोराला ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये प्रवेश नाकारला की चोर यूपीआय पेमेंटसारख्या इतर सुविधांमधून पैसे चोरण्याचा करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ते शक्य तितक्या लवकर बंग करा.


सर्व मोबाइल वॉलेट ब्लॉक करा...


मोबाइल वॉलेटमुळे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. पण जर तुमचा फोन चुकीच्या हातात गेला तर गुगल पे आणि पेटीएमसारखे मोबाईल वॉलेट महागात पडू शकतात. संबंधित अॅपच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधा आणि नवीन डिव्हाइसवर वॉलेट रिसेट केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची खात्री करा.


पोलिसांत तक्रार दाखल करा...


आपल्या चोरलेल्या डिव्हाइसची माहिती पोलिसांना देणे देखील आवश्यक आहे. आपण जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये फोन चोरीची तक्रार दाखल करू शकता आणि त्यांच्याकडून एफआयआरची प्रत देखील मिळवू शकता. जर तुमच्या फोनचा गैरवापर होत असेल किंवा तुमच्या फोनमुळे तुमचे पैसे चोरीला गेले असतील तर ही प्रत तुमच्यासाठी पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल.


इतर महत्वाची बातमी-


Challan on Helmet : तुमची एक चूक अन् हेल्मेट घालूनही बसू शकतो दंड; तुम्ही गाडी चालवताना ही चूक करता का?