Tata Group Market Cap: देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहासाठी (Tata Group) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टाटा समूहाच्या मार्केट कॅपने (Market Cap) 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही घटना ऐतिहासीक आहे. कारण हा पराक्रम करणारा टाटा समूह हा देशातील पहिला समूह आहे. या समूहाच्या 25 सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 30.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


अंबानी-अदानी कुठे?


देशातील आघाडीच्या उद्योगसमूह टाटा समूहाच्या मार्केट कॅपने 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील कोणत्याही व्यावसायिक घराण्याने प्रथमच हा टप्पा गाठला आहे. टाटा समूहाचे मार्केट कॅप 30.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह आ णि गौतम अदानी यांचा अदानी समूह यामध्ये जवळ कुठेही कोणी नाही. रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप 21.6 लाख कोटी रुपये आहे. तर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची मार्केट कॅप 15.6 लाख कोटी रुपये आहे. या यादीत एचडीएफसी समूह चौथ्या क्रमांकावर आहे. या समूहाची मार्केट कॅप 13 लाख कोटी रुपये आहे. बजाज समूह 10 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील पहिल्या पाच व्यवसायिक घराण्यांमध्ये आहे. 


टाटा समूहाची सर्वात मौल्यवान कंपनी TCS


टाटा समूहाच्या 25 सूचीबद्ध कंपन्या आहेत. एकूण मार्केट कॅपमध्ये फक्त पाच कंपन्यांचा हिस्सा 80 टक्क्यांहून अधिक आहे. समूहाची सर्वात मौल्यवान कंपनी TCS आहे, जिचे मार्केट कॅप 15.1 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. टाटा मोटर्स ही टाटा समूहातील TCS नंतर दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याची मार्केट कॅप 3.4 लाख कोटी रुपये आहे. ही देशातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी आहे. टायटन मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा समूहात तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची मार्केट कॅप 3.2 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील 1.8 लाख कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आणि टाटा पॉवर 1.3 लाख कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. या वर्षी ग्रुप आयटी कंपनी टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये 1.2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षी समूहाच्या मूल्यांकनात TCS ने 60 टक्के योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे यावर्षी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांची वाढ झाली असून टायटनला मागे टाकून ती टाटा समूहाची दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.


टाटा समूह हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे 


टाटा समूह हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असले तरी ते जगातील सर्वात मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टपेक्षा खूप मागे आहे. टाटा समूहातील कंपन्यांचे मार्केट कॅप मायक्रोसॉफ्टच्या केवळ 12 टक्के आहे. मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप 3.1 ट्रिलियन डॉलर आहे. आयफोन निर्माता ॲपलची मार्केट कॅप 2.9 ट्रिलियन डॉलर आहे. सौदी आरामकोची मार्केट कॅप दोन ट्रिलियन डॉलर्स आहे आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटची मार्केट कॅप 1.8 ट्रिलियन डॉलर आहे. टाटा समूहाचे मार्केट कॅप 0.36 ट्रिलियन डॉलर आहे. तर TCS चे मार्केट कॅप 0.18 ट्रिलियन डॉलर आहे.


महत्वाच्या बातम्या:


टाटा ग्रुपचा एअरबससोबत करार, आता भारतातच बनवणार 'हे' विमान