Ankita Lokhande :  सिनेसृष्टी आणि कास्टिंग काऊच या गोष्टी अनेकदा कानावर पडत असतात. काही अभिनेत्रींनी या बाबतीतले आपले भयंकर अनुभव प्रेक्षकांसोबत विविध माध्यमातून अनेकदा शेअर केले आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही (Anika Lokhande) दोन वेळेस कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. दाक्षिणात्य चित्रपटाच्या वेळी तिला हा अनुभव आला होता. 


छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात  स्थान मिळवले आहे. अंकिता लोखंडेलाही सिनेइंडस्ट्रीतील कास्टिंग काऊच सारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. नुकतंच तिने याबाबतचा प्रसंग सांगितला. अंकितावर प्रसंग ओढावला तेव्हा ती अवघ्या 19-20 वर्षांची होती. या लहान वयातही तिने प्रसंगावधान राखत कास्टिंग काऊच सारख्या संकटाला दूर सारले. 


अंकिताने सांगितले की, कास्टिंग काउचशी तिची पहिली गाठ पडली होती जेव्हा ती तिच्या करिअरची सुरुवात करत होती आणि तिला एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर तिला डील करण्यास सांगितले.


अंकिताने सांगितले की, मी स्मार्ट होते आणि त्या खोलीत एकटीच होते. त्यावेळी मी 19 किंवा 20 वर्षांची असावी. मी त्या व्यक्तीला विचारले की, तुमच्या निर्मात्याला कोणत्या प्रकारची डील करायची आहे. मला कोणत्या पार्टीत जावे लागेल की डिनरला जावे लागेल? अंकिताने सांगितले की समोरच्या त्या व्यक्तीने थेट निर्मात्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगावे. ज्या क्षणी त्याने माझ्या समोर ही गोष्ट म्हटली, त्याच वेळी मी त्याचा बँड वाजवला. 


अंकिताने पुढे म्हटले की, मला वाटते की तुमच्या निर्मात्याला एखाद्या मुलीसोबत झोपायचे आहे. त्याला आपल्या  चित्रपटात  टॅलेंटेड अभिनेत्री नको हवी, असे सुनावत मी थेट तिथून निघाली असल्याचे तिने सांगितले. त्या दरम्यान, मला त्यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर दिली. मात्र, मी थेटपणे नकार देत मला तुमच्या चित्रपटात काडीचाही रस नसल्याचे म्हटले. 






एका मोठ्या अभिनेत्याने ही.... 


दुसऱ्या घटनेबद्दल बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, 'जेव्हा मी पुन्हा चित्रपटांमध्ये परतले, तेव्हा मला हे पुन्हा जाणवले. मी फक्त त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केले. मला त्यांचे नाव घ्यायचे नाही, तो एक उत्तम अभिनेता होता. त्याच क्षणी मला वाईट वाइब्स जाणवल्याने पटकन हात मागे घेतला आणि तिथून निघाली.