Tata Group : टाटा समूह (Tata group) हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. रतन टाटा (Ratan tata) हे या समुहाचे प्रमुख आहेत. आता त्यांच्यानंतर कोण टाटा ग्रुपमचा प्रमुख कोण असेल? एवढं मोठं व्यापारी साम्राज्य कोण सांभाळणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द रतन टाटा यांनी शोधून काढले आहे. कारण त्यांनी टाटा समुहाच्या वारसदारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात हे वारस संपूर्ण टाटा ग्रुपचा भार सांभाळतील. विशेष म्हणजे या वारसदार दोन्ही मुली असून, त्यांचे वय 40 वर्षेही नाही. 


रतन टाटा यांचा धाकटा भाऊ नोएल टाटा यांच्या मुली या टाटा ग्रुपच्या वासरदार होण्याची शक्यता आहे. लीह, माया या दोन मुली आणि नेविल टाटा हा मुलगा आहे. हे दिघेही मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहतात. तसेच, रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. जेणेकरुन त्या भविष्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवसाय साम्राज्य हाताळू शकतील.


टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डाने 2 नोव्हेंबर 2022 रोजी लिया, माया आणि नेविल टाटा यांना समाविष्ट केले आहे. या तिघी सध्या रतन टाटा यांच्या मार्गदर्शाखाली काम करत आहेत. अंदाजे 3 हजार 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे रतन टाटा हे मालक आहेत. लेआ, माया आणि नेविल टाटा कोण आहेत आणि ते सध्या कोणते काम करत आहेत याबद्दल देखील माहिती पायुहात. 


लिया टाटा समूहाची हॉटेल्स पाहत आहे


नेविल टाटा यांची मोठी मुलगी लीह टाटा हॉटेल उद्योगाचा व्यवसाय सांभाळत आहे. ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. माद्रिदमधील IE बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, लेहला विक्री विभागात कामाचा अनुभव मिळाला. त्यानंतर, तिने इंडियन हॉटेल कंपनीकडे, टाटा ग्रुप ऑफ हॉटेल्सचे प्रमुख युनिट, व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स हाताळली.


माया टाटा यांच्याकडे कोणता कारभार?


लिया टाटा यांची धाकटी बहीण माया टाटा हिने रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी येथे पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि गुंतवणूकदार संबंध प्रतिनिधी म्हणून काम केले. युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक आणि बेज बिझनेस स्कूलच्या पदवीधर, माया यांनी टाटा समूहातील अनेक भूमिकांमध्ये योगदान दिले आहे. त्यांनी अलीकडेच टाटा कॅपिटलमधील त्यांचा कार्यकाळ संपवला आणि त्यांचे लक्ष टाटा डिजिटलकडे हस्तांतरित केले.


रिटेल व्यवसायावर नेविल टाटा यांचे लक्ष


नोएल  टाटा यांचा धाकटा मुलगा नेविल टाटा हा बेज बिझनेस स्कूलचा पदवीधर आहे. डीएनए रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रमुख पद सांभाळत आहेत. ही कंपनी वेस्टसाइड आणि स्टार मार्केट सारख्या विविध टाटा ब्रँडच्या व्यवस्थापनावर देखरेख करणारी मूळ कंपनी म्हणून काम करते. आपल्या मोठ्या बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवून नेविल टाटा यांनी अनेक बहु-राष्ट्रीय गटांमधील अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Tata Group : टाटा समूहातील 'या' कंपनीमध्ये होणार नोकर कपात; 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड