मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि माझी ईडीच्या (ED) कार्यालयात भेट होऊ अशी माझी इच्छा असल्याचं म्हणत भाजपचे नते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोविड काळातील घोटाळ्यांविषयी भाष्य केलं आहे. महानगरपालिकेच्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरु करण्यात आलीये. या सगळ्या घोटाळ्यांची उत्तरं ही मातोश्रीला द्यावी लागतली, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. 


कोविड काळामध्ये हायवे  कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आलं होतं. याआधी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला पेंग्विन आणण्यापासून ते आतापर्यंत 53 कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेत.  त्याचे मालक रोहीला छेड्डा हे आदित्य ठाकरेंचे मित्र आहेत. आदित्य ठाकरेंचे मित्र असल्याने त्यांना हे काम देण्यात आले. त्यावेळचे मंत्री अस्लम शेख यांनी त्या कंपनीला  ऑक्सिजन प्लांट संदर्भात काम देण्यासाठी विरोध केला होता. पण तरीह त्या कंपनीला काम दिले. त्यांनी त्या कंपनीला 140 कोटींचं काम दिलं होतं. त्यामध्ये फक्त 38 कोटींचा खर्च झाला होता. त्यामधले बाकीचे 102 कोटी कुठे गेले असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय. तसेच मुंबई पोलीस, आयकर विभाग आणि ई़डी या सगळ्याची लवकच चौकशी करेल आणि त्याचा तपास देखील सुरु होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं. 


'उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना हिशोब द्यावा लागणारच'


हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला शेल कंपनी मार्फत सर्व पैसे देण्यात आले होते. त्यामुळे ते पैसे कुठे गेले, कुणाला पोहचले ही सर्व माहिती आता समोर येईल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना हिशोब द्यावा लागेलच. कोविड काळातील घोटाळ्यांचे अनेक धागेदोरे हे आदित्य ठाकरेंपर्यंत पोहचतात. त्यामुळे त्यांची आणि माझी ईडी कार्यालयात भेट होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं.  


मी केलेले सर्व आरोप पुराव्यांच्या आधारावर - करीट सोमय्या


त्यावेळी मंत्री अस्लम शेख यांनी हे काम हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यास विरोध केला होता. त्यावेळची कादपत्र देखील माझ्याकडे आहेत. पण तरीही हे कॉन्ट्रक्ट हायवे कंपनीला देण्यात आलं. ती कंपनी ब्लॅक लिस्ट असूनही त्याच कंपनीला सगळी कामं देण्यात आली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचं महानगरपालिका चालवतात हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता या सगळ्याची उत्तरं मातोश्रीला द्यावीच लागतील, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. 


हेही वाचा : 


Ajit Pawar Amol Kolhe : सकाळी खासदार अपात्रतेच्या पत्रातून नाव वगळलं, दुपारी अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला; कोल्हे म्हणतात...