TATA and BSNL Deal : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली आहे. टेलकॉम कंपन्यांच्या या निर्णयाचा थेट फटका सामान्यांना बसतोय. या तिन्ही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन्स सध्या वाढले आहेत. याच कारमाणुळे अनेकजण आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत. समाजमाध्यमावर आपले कार्ड बीएसएनएलवर पोर्ट करा, असा ट्रेंड चालू झाला होता. असे असतानाच आता टाटा आणि बीएसएनएल यांच्यात एक मोठा करार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिर्स आणि बीएसएनएल यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा एक करार होत झाला आहे. टीसीएस आणि बीएसएनएल या दोन कंपन्या मिळून 4G इंटरनेट सर्व्हिस 1000 गावांपर्यंत घेऊन जाणार आहेत. यामुळे या 1000 गांवात इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.


जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार


सध्या देशात जवळजवळ सर्वच भागांत 5 जी इंटरनेट सेवा सक्रिय झालेली आहे. 5 जी सेवा पुरवण्यात जिओ, एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोन या कंपन्या आघाडीवर आहेत. तर 4 जी इंटरनेट सेवेतही या कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र टाटा आणि बीएसएनए यांच्यात झालेल्या करारामुळे बीएसएनल 4 जी इंटरनेट सेवा क्षेत्रात आणखी मजबूत होऊ शकतं. यामुळे जिओ आणि एअरटलेसारख्या कंपन्यांचं टेन्शन वाढू शकतं. 


टाटा उद्योग समुहाकडून देशातील चार भागांत डेटा सेंटर उभारले जात आहे. या डेटा सेंटरच्या माध्यमातून 4 जी सेवा आणखी मजबूत केली जाणार आहे. BSNL कडून देशभरात 9000 पेक्षा अधिक 4G नेटवर्क लावण्यात आले आहेत. भविष्यात 1 नेटवर्क्स उभारण्याचे बीएसएनएलचे लक्ष्य आहे. 


जिओ-एअरटेलच्या रिचार्जमध्ये वाढ 


दरम्यान, जिओ या टेलकॉम कंपनीने जून महिन्यात आपल्या डेटा प्लॅनमध्ये वाढ केली आहे. जिओच्या या निर्णयानंतर एअरटेल आणइ व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनीदेखील आपल्या रिचार्जमध्ये वाढ केली. जिओ आणि एअरटेलचा नवा दर 3 जुलैपासून लागू होणार आहे. तर व्होडाफोन-आयडिया कंपनीचा वाढीव दर 4 जुलैपासून लागू होईल. अन्य टेलकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओने आपल्या डेटा प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. ही वाढ साधारण 12 ते 25 टक्के आहे. तर एअरटेलने वाढवलेला हा दर 11 ते 21 टक्के आहे. व्होडाफोन आयडियाने वाढवलेला हा दर 10 ते 21  टक्के आहे. याच वाढीव दराविरोधात नेटकऱ्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला होता. 


हेही वाचा :


Income Tax : क्रेडिट कार्डने कर भरा अन् मिळवा 'हा' फायदा, वाचा सविस्तर!


निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, देशाच्या अर्थसंकल्पाच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?


खुशखबर! EPFO खातेधारकांना लवकरच मिळणार व्याज, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय