Trigrahi Yog In Mithun : ज्योतिष शास्त्रानुसार, 16 जुलैला शुक्र, बुध आणि सूर्य एकाच राशीत एकत्र आल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती होईल. काही राशीच्या लोकांना याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील, तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. मुख्यत: 3 राशीच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या 3 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या बाराव्या घरात तीन ग्रहांची युती होत आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार नाही. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी तर मिळेल, मात्र यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असं नाही. यासोबतच एखाद्या कामात तुम्हाला विलंब होऊ शकतो. जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. यासोबतच आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते. निरुपयोगी गोष्टींमध्ये पडणं टाळा, याने फक्त तुमचं नुकसान होईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या सातव्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र यांचा संयोग होत आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांसाठी या तीन ग्रहांची युती संमिश्र परिणाम देणारी ठरेल. त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना अपार यश मिळवून देऊ शकतो. पण तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक देखील ठरू शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. नात्यांबाबत थोडं सावध राहा, कारण काही कारणाने तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio)
त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तितका अनुकूल ठरणार नाही. या काळात तुमच्या प्रगतीचा वेग मंदावेल. या काळात थोडा संयम राखा. जास्त रागवू नका, रागावर नियंत्रण ठेवा. मद्यपानाचं सेवन टाळा आणि अनावश्यक बडबड करू नका. या राशीच्या लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: