Swiggy Ordered : 2023 या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर (Online Ordered) करण्याचा ट्रेंड लक्षणीय वाढला आहे. यावर्षीही लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केले आहेत. विश्वचषक असो, दिवाळी असो किंवा होळी ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणाची मागणी यंदा खूप वाढली आहे. स्विगीच्या (Swiggy) ताज्या आकडेवारीनुसार,लोकांनी यावर्षी सर्वात जास्त ऑर्डर  रसगुल्ला किंवा गुलाब जामुन नसून अशी वस्तू आहे जी जाणून तुम्हाला धक्का बसेल.


यावर्षी, लोकांनी स्विगीतून दिवसाला 207 पिझ्झा ऑर्डर करण्यापासून ते व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दर मिनिटाला 271 केक ऑर्डर केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऑर्डरबद्दल सांगणार आहोत, ज्याने 2023 मध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. स्विगीने आपल्या वार्षिक अहवाल How India Swiggyd 2023 मध्ये आपल्या ऑर्डर व्हॉल्यूमबद्दल काही खुलासे केले आहेत. यंदाही बिर्याणी आघाडीवर राहिली हे. या वर्षी स्विगीवर सर्वात जास्त बिर्याणीची ऑर्डर करण्यात आली आहे. 


लाखोंचे खाद्यपदार्थ मागवले


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका ग्राहकाने वर्षभरात स्वीगीकडून 42.3 लाख किमतीची फूड ऑर्डर केली होती. यातील बहुतांश ऑर्डर चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादच्या युजर खात्यांमधून होत्या. त्या प्रत्येकाने 10,000 पेक्षा जास्त ऑर्डर दिली आहे. यावर्षी झाशीतून 269 वस्तू मागवण्यात आल्या होत्या. तर भुवनेश्वरमध्ये एकाच दिवसात 207 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती.


मिठाईत गुलाबजामुनची आघाडी


अहवालानुसार, या वर्षी दुर्गा पूजेदरम्यान, गुलाब जामुनने 7.7 दशलक्षाहून अधिक ऑर्डर्ससह इतर सर्व मिठाईंना मागे टाकले. गरब्यासोबतच नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांच्या शाकाहारी ऑर्डरमध्ये मसाला डोसा अव्वल आहे. हैदराबादमधील एका ग्राहकाने इडलीसाठी 6 लाख रुपये खर्च केले. प्रत्येकाच्या आवडत्या चॉकलेट केकसाठी 8.5 दशलक्ष ऑर्डर्स दिल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे 2023 दरम्यान, देशात दर मिनिटाला 271 केक मागवण्यात आले. नागपुरातील एका ग्राहकाने एकाच दिवसात 92 केक मागवले.


सलग आठव्या वर्षी बिर्याणी आघाडीवर


बिर्याणी सलग आठव्या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश आहे. 2023 मध्ये भारत प्रत्येक सेकंदाला 2.5 बिर्याणी ऑर्डर करतो. प्रत्येक 5.5 चिकन बिर्याणीसाठी एक व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी 70 प्लेट बिर्याणीची ऑर्डर दिली होती. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान, स्विगीला दर मिनिटाला 250 पेक्षा जास्त बिर्याणीच्या ऑर्डर मिळत होत्या.


महत्त्वाच्या बातम्या:


"न स्विगी, न झोमॅटो, मुलांना घरीच खाऊ घाला आईच्या हातचं हेल्दी जेवण"; हायकोर्टाचा पालकांना मोलाचा सल्ला