नाशिक : नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया समोर आलीये. नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजरांनी केलाय.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे. दरम्यान या आरोपांवर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, ही जाणीवपूर्वक भेट झालेली नाही, कोणत्यातरी सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झालेली असू शकते किंवा हा व्हिडिओ मॉर्फिंग देखील असू शकतो, आम्ही पोलिसांना सर्व प्रकराच्या चौकशीसाठी सहकार्य करु. 


लीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast)  खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो  नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे. हा


हा बेबनाव व्हिडिओ, बडगुजरांनी आरोप फेटाळले


2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा घेतली होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला अटक झाली आणि मी 15 दिवस तुरुंगात होतो. राजकारणमध्ये मी आलो तेव्हा माझ्यावर एक केस ही नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत, मॉर्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असं म्हणत बडगुजरांनी आरोप फेटाळले आहेत. 


योग्य माहिती घेऊन आरोप करावेत - सुधाकर बडगुजर


जे आरोप केलेत त्याची योग्य माहिती घेऊन आरोप करावते. सलीम कु्त्ता याच्याशी माझा काहीही संबंध नव्हता आणि नाहीये. तो जेलमधून कसा बाहेर आला हे मला माहित नाही. फडणवीस म्हणाले तो पॅरोलवर आला. तो पॅरोलवर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात आमची कुठे भेट झाली माहिती नाही, असं बडगुजर म्हणाले. यावेळी बोलताना सुधाकर बडगुजरांनी पालकमंत्री आणि प्रफुल पटेलांवर देखील निशाणा साधला. प्रफुल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं जॉईन वेंचर आहे, त्याचं काय झालं असा सवाल देखील बडगुजरांनी यावेळी उपस्थित केलाय. 


हेही वाचा : 


मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप