Success Story : अलिकडच्या काळात शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत, ज्या शेतकऱ्याने भरडधान्याच्या (millet) शेतीतून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. दिलप्रीत सिंग (Dilpreet Singh) असं पंजाबमधील (punjab) या शेतकऱ्याचं नाव आहे.
भरडधान्याची ऑस्ट्रेलियाला निर्यात
दिलप्रीत सिंग यांना भातशेतीतून काही जास्त नफा मिळत नव्हता. म्हणून त्यांनी बाजरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 8 एकर शेतात बाजरी पिकवण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी चांगल उत्पादन घेतलं आहे. .विशेष म्हणजे पंजाबमधील या शेतकऱ्याने केवळ बाजरीचे उत्पादनच घेतले नाहीतर बाजरीसह इतर अनेक भरडधान्याचं उत्पादन घेतलं आहे. या उत्पादनांची त्यांनी परदेशात निर्यातही केली आहे. बाजरीची त्यांनी ऑस्ट्रेलियाला निर्यातही केली आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळाला आहे. दिलप्रीत सिंग यांनी 2019 मध्ये नाचणी आणि बाजरीची पेरणी केली होती. बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पुढाकार घेत असताना, दिलप्रीत आधीच बाजरीच्या लागवडीकडे वळले होते. पंजाबमध्ये पाण्याची कमतरता आणि रासायनिक खतांचा अतिवापर झाला आहे. यामध्ये बाजरीच्या पिकाचे उत्पादन काढणे हे मोठं आव्हान होते. मात्र त्यांनी योग्य नियोजनाद्वारे बाजरीचे चांगले उत्पादन घेतले.
सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांनी केला होता विरोध
सुरुवातीच्या काळात दिलप्रीत यांना अनेक शेतकऱ्यांनी विरोधही केला होता. भरडधान्याची लागवड केल्यास नफ्यापेक्षा तोटाच जास्त होईल, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले होते. मात्र, दिलप्रीत सिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष करत भरडधान्याची लागवड केली. यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरीसह इतर अनेक प्रकारच्या पिकांची लागवड केली. प्राचीन काळी ते आजच्या तुलनेत भारतात जास्त खाल्ले जात होते. सरकारने देखील या भरडधान्याला 'श्री अण्णा' म्हटले आहे. भरडधान्यातून शरीराला उर्जा मिळते.
ऑस्ट्रेलियाला 38 लाख रुपयांच्या बाजरीची निर्यात
तांदूळ आणि गव्हाला पर्याय म्हणून बाजरी हे कोणी स्वीकारत नाही. हे लक्षात आल्यानंतर केल्यास नफ्यापेक्षा तोटाच जास्त होईल, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले होते. मात्र, दिलप्रीत सिंग हे जागतिक बाजारपेठेकडे वळले. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) च्या मदतीने ऑस्ट्रेलियाला त्यांनी 38 लाख रुपयांची सुमारे 14 टन बाजरी निर्यात केली आहे. एवढं भरडधान्य निर्यात करणारे दिलप्रीत सिंग हे पहिलेच शेतकरी ठरले आहेत. या चालू वर्षात कॅनडामध्येही भरधान्याची निर्यात करण्याचे दिलप्रीत यांचे उद्दीष्ट आहे. कॅनडामध्ये आपली निर्यात वाढवून 2024-25 या आर्थिक वर्षात 75-80 लाख रुपयांची विक्री गाठण्याचे लक्ष त्यांनी ठेवलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतात सर्वाधिक बाजरीचं उत्पादन कोणत्या राज्यात होते? बाजरीच्या मागणीत देशात वाढ