Vidarbha Weather Update नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भात

  उष्णतेचा पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असताना दुसरीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.


नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही नागपूर प्रदेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.


विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा


आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर  आज पासून पुढील 5 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी काळात विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.


तर आज अकोला येथे 9.1 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती येथे 12.7, भंडारा येथे 5.2, बुलढाणा इथे सर्वाधिक 16.1 तर चंद्रपुर येथे 7.3 आणि गोंदिया येथे 1.5 मीली मीटर पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या वैदर्भीयांना पुढील काही दिवस काहीसा दिलासा मिळणार आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, केळीच्या बागांना फटका


राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह मकाठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊास झालाय. याचा शेती पितांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव , संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या.


संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. तसेच भाजीपाला पिकांचंही नुकसानं झालं आहे. यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या