Success story : अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसतायेत. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न काढत आहेत. तरुण शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहे. सध्या शेतकरी विविध प्रकारच्या बागांची शेती करत आहेत. एका अशाच राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा जिल्ह्यातील संग्रामगडच्या युवा शेतकरी अभिषेक जैन (Abhishek Jain) याने लिंबू शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. या लिबांच्या शेतीतून (lemon Farming) हा तरुण वर्षाला 12 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे. तायमुळं त्याची 'लेमन किंग' (lemon king) अशी ओळख झाली आहे. जाणून घेऊयात लेमन किंगची यशोगाथा.
लेमन मॅन म्हणून ओळख
अभिषेक जैन यांनी अथक प्रत्नातून लिंबाच्या बागेतून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. सुरुवातीच्या काळात डाळिंब, पेरुच्या बागा होत्या. मात्र, त्यातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नव्हते, म्हणून अभिषेक जैन यांनी लिंबाची शेती करायला सुरुवात केली. यातून त्यांनी मोठा नफा मिळवला आहे. सुरुवातीच्या काळात अभिषेक यांनी विविध आव्हानांना सोमरं जावं लागलं. मात्र, नंतरच्या काळात त्यांना यातून चांगला नफा झाला. त्यामुळं लोक अभिषेक जैन यांना आता लेमन मॅन म्हणून ओळखत आहेत.
डाळिंब आणि पेरुच्या बागा काढून लिंबाची लागवड करण्याचा निर्णय
अभिषेक हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वत:ची एक कंपनी सुरु केली होती. मात्र, वडिलांच्या निधनानंतर त्यांनी ही कंपनी बंद केली. त्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळं त्यांनी धाडसी निर्णय घेतले. त्यांनी डाळिंब आणि पेरुच्या बागा काढून टाकल्या. कारण त्यांना यातून अपेक्षीत नफा मिळाला नाही. त्यामुळं त्यांना बागा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. वार्षिक ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
चार एकर क्षेत्रावर लिंबाची लागवड
अभिषेक जैन यांना एकूण सहा जमीन आहे. यामध्ये चार एकर क्षेत्रावर लिंबाची लागवड करण्यात आली आहे. तसेच फुड प्रोसिसिंगचा व्यवसाय करुन ते लोणचे देखील विकत आहेत. अभिषेक जैन हे पारंपारिक शेती सोडून व्यवसायाकी शेती करत आहेत. यातून ते चांगला नफा कमावत आहेत. त्यांनी आपल्या शेतात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नाही. ते सेंद्रीय खतांचा वापर करत आहेत. त्यामुळं जमिनीचा कस कायम राहतो.
अभिषेक जैन यांचा लिंबाच्या लोणच्याचा स्पेशल ब्रॅड
अभिषेक जैन यांनी स्वत:च लिंबाच्या लोणच्याचा ब्रॅड तयार केला आहे. त्यांनी तयार केलेल्या या लोणच्याला मोठी मागणी आहे. अभिषेक जैन हे एकूण लिंबाच्या 20 टक्के लिंबाचे लोणचे तयार करतात. तर बाकीच्या लिंबाची विक्री करतात. यातून त्यांना मोठा नफा होत आहे.
महत्वाच्या बातम्या: