Success Story : जीवनात कष्ट करण्याची तयारी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण निश्चित यशस्वी होतो. कितीही संकट आली तरी देखील त्या संकटांवर मात करता येते. महेश गुप्ता (mahesh gupta) ही अशीच एक व्यक्ती आहे की, त्यांनी संघर्षातून मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्यांनी प्युरिफायरद्वारे अशुद्ध पाणी स्वच्छ करण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञान विकसित केले आहे. केंट आरओच्या माध्यमातून ते घरोघरी पोहोचले आहेत. पाहुयात त्यांची यशोगाथा.


महेश गुप्ता यांची मुले खराब पाण्यामुळे आजारी पडत होती. यावेळीच महेश गुप्ता यांनी वॉटर प्युरिफायर बनवण्याचा निर्णय घेतला. आज ते केंट आरओ या 1100 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या केंट आरोच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.  1999 मध्ये त्यांना यामध्ये यश मिळाले. त्यांनी बाजारात स्वस्त दरात वॉटर प्युरिफायर विकायला सुरुवात केली. यातून त्यांच्या व्यवसायावर लोकांचा विश्वास बसत गेला. आज त्यांनी स्वत:च मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे. आज बाजारात अनेक कंपन्यांचे वॉटर प्युरिफायर मिळू शकते. पण एक काळ असा होता की देशातील अनेक लोक खराब पाण्यामुळे आजारी पडत होते. महेश गुप्ता यांच्या दोन मुलांनाही खराब पाण्यामुळं कावीळ झाली होती. त्या वेळी, बाजारातील बहुतेक वॉटर प्युरिफायर अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानावर आधारित होते. त्यामुळे महेश गुप्ता यांना आरओ बनवण्याची कल्पना आली आणि ती कल्पना त्यांनी सत्यात उतरवली. 


महेश गुप्ता यांचे आयआयटीमधून शिक्षण


महेश गुप्ता यांनी आयआयटी कानपूरमधून (IIT Kanpur) मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर महेश गुप्ता सरकारी कंपनी इंडियन ऑईलमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते. पण केंट आरओसाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यावेळी महेश गुप्ता यांच्याकडे 20,000 रुपयांची बचत होती. ज्याचा वापर करुन त्याने मेम्ब्रेन आणि पंप बसवून होम प्युरिफायर बनवले. सतत सहा महिने त्यावर काम करत राहिलो, पण स्पष्टता येऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी प्युरिफायरद्वारे अशुद्धतेपासून पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञान विकसित केले. ज्यामुळं त्यांना समस्येचे समाधान मिळाले.  एक यशस्वी प्युरिफायर देखील तयार झाले. 1999 मध्ये महेश गुप्ता यांनी यश मिळाले. त्यांनी बाजारात स्वस्त दरात वॉटर प्युरिफायर विकायला सुरुवात केली. 


उत्तम उत्पादने आणि उत्कृष्ट विपणन धोरणाच्या जोरावर Kent RO ने आज मोठं यश मिळवलं आहे.  केंट आरओच्या ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री हेमा मालिनी आहेत. आज ही कंपनी RO सोबत इतरही अनेक उत्पादने बनवते. त्याची उलाढाल 1100 कोटींच्या पुढे गेली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


पालक शेतीचा अनोखा प्रयोग, तरुण शेतकऱ्यांनी केली 15 लाखांची कमाई