Balasaheb Thorat नाशिक : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन अभूतपूर्व आहे. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या बरोबर चालत आहेत. आरक्षण (Maratha Reservation) मिळावे ही त्यांची भावना आहे. युवकांना जीवनात काहीतरी आनंद मिळवा यासाठी सुरु असणारी ही धडपड आहे. सरकार त्या बाबतीत गंभीरपणे विचार करेल. मराठ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा आहे.  केंद्र सरकारच्या (Central Government) हातात बरेच काही आहे. केंद्र सरकार यावर मार्ग काढू शकते. केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आरक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाशिकमध्ये (Nashik) दिली आहे. 


बाळासाहेब थोरात म्हणाले की, मोफत शिक्षणापेक्षा आरक्षण अधिक महत्वाचे आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे.  केंद्र सरकारने ठरवले तर होवू शकते. राज्य सरकारमधील प्रमुख मंडळींचे केंद्र सरकारसोबत चांगले संबंध आहेत. पंतप्रधानांना मराठा आरक्षणाचा विषय माहिती आहे. त्यामुळे गांभीर्याने निर्णय घ्यायचे ठरवले तर सब मुमकिन है, असे ते म्हणाले.


मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 



  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या,

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या,

  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा,

  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा,

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा,

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या,

  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या,

  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या,

  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही,


काही जागांवर ३० तारखेला चर्चा होणार


दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की,  ४८ जागांचे वाटप आहे. काही जागांवर आम्ही तीन प्रमुख पक्ष किंवा काही जागांवर दोघे दावा करत आहोत. त्यावर चर्चा झाली आहे. काही जागांवर ३० तारखेला चर्चा होणार आहे. ५ ते १० जागांवर चर्चा करावी लागणार आहे. इतर जागांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 


काँग्रेसची उद्या धुळ्यात बैठक


नाना पटोले, अशोक चव्हाण आणि माझ्यावर जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी आहे. विभागवार बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या धुळ्यात बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


इतर पक्षातील नेत्यांशिवाय भाजप सत्तेत येणार नाही


भाजप सक्षम नाही. त्यामुळे त्यांना इतर पक्षांचे लोक घ्यावे लागत आहेत. इतर पक्षातील नेते घेतल्याशिवाय ते सत्तेवर येऊ शकत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. भाजपवाले दुर्बल आहेत, हे सिद्ध करत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. 


आणखी वाचा


Pankaja Munde : "एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको"; पंकजा मुंडेंचे नाशकात वक्तव्य