Success Story of banana farming : अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. त्या शेतकऱ्यानं केळीच्या पिकातून (banana farming) मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखाना ब्लॉकचे रहिवासी तरजन सिंह यांनी केळी शेतीचा यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड करुन ते वर्षभरात त्यांनी निव्वळ 13 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.


अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखाना ब्लॉकमध्ये राहणारे शेतकरी तरजन सिंह यांनी केळीच्या पिकातून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते केळीची लागवड करत आहेत. वर्षाला 13 लाख रुपये एवढी मोठी कमाई करुन ते आता श्रीमंत झाले आहेत. आहे.


दीड हेक्टरमध्ये 5500 केळीची रोपे 


तरजन सिंह यांनी दीड हेक्टरमध्ये 5500 केळीची रोपे लावली होती. एका रोपाची किंमत सुमारे 19 रुपये आहे. अमेठीतीली जैन कंपनी केळीची चांगली रोपे पुरवते. 1.5 हेक्टरमध्ये सिंह यांनी 13 लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. ही सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. केळीची विक्री ही  गौरीगंज आणि अमेठीच्या स्थानिक बाजारात विकली जाते. तर बाहेरुन आलेली व्यापारी देखील केळीची खरेदी करतात अशी माहिती तरजन सिंह यांनी दिली.


केळीच्या पिकासाठी 3.30 लाख रुपयांचा खर्च 


दरम्यान, तरजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळीची शेती ही फायदेशीर शेती आहे. ही शेती योग्य वेळी मेहनत करुन केली तर त्याचा फायदा होतो. सेंद्रिय पद्धतीने केळीची लागवड केली आहे. तसेच केळीच्या लागवडीत शेणखताचा वापर केलाय. यासोबतच वेळोवेळी कीटकनाशकांचा वापर केलाय. जेणेकरून पीक रोगमुक्त राहील. या बागेसाठी मला 3.30 लाख रुपये खर्च आल्याची माहिती सिंह यांनी दिली. तरजन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळीच्या बागेसाठी योग्य पाण्याचे नियोजन केले होते. ड्रीप सिस्टीमद्वारे पाण्याचे व्यवस्थापन केल्याची माहिती सिंह यांनी दिली. केळीच्या पिकातून आपण कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतो अशी माहिती यावेळी तरजन सिंह यांनी दिली.  दरम्यान, इतर शेतकरीही केळीची लागवड करून नफा कमवत असल्याचे सिंह म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


एका बाजूला अवकाळीचा फटका, दुसऱ्या बाजूला रोगांचा प्रादुर्भाव, केळी उत्पादक सावरणार कसा?