Agriculture News Banana Farming: सध्या राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Useasonal Rain) धुमाकूळ घातलाय. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसलाय. विशेषत: केळीच्या बागांचं (Banana Farming) मोठं नुकसान झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला केळीवर (Banana) करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील केळीला पिकाला फटका
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील केळीला राज्यभरासह देशभरात मोठी मागणी असते. त्यामुळं यावर्षी देखील येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केलीय. मात्र, हाच केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं काहीस चित्र आहे. कारण, नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सततच्या वातावरणातील बदलामुळं केळी पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ऐन फळधारणा परिपक्व होण्याच्या अवस्थेतच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय. याचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसासह गारपीट देखील झालीयं. यामध्ये केळीच्या बागा जमिनदोस्त झाल्या आहेत. कारण वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळं या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाच्या शक्यता आहे. 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळं आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Keral) दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर मान्सून महाराष्ट्रात कधी दाख होईल याबाबतचा सवाल देखील उपस्थित केला जातोय. तर येत्या 8 ते 9 जूनदरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Unseasonal Rain : विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान! धान्य भिजलं, केळी पिकांचेही प्रचंड नुकसान