Success Story : इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर अनेकजण यशस्वी झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांच्या यशोगाथा या लोकांसाठी प्रेरणादायी असतात. आज आपण अशाच एका महिलेच्या यशोगाथेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही महिला एकेकाळी केवळ गृहिणी होती, परंतू आज तिने व्यावसायिक जगतात एक नवीन स्थान निर्माण केलं आहे. शीला कोचौसेफ चित्तीलापिल्लई (Sheela Kochouseph Chittilappilly) असं या महिलेचं नाव आहे. 


शीला कोचौसेफ चित्तीलापिल्लई यांनी कर्ज घेतलेल्या पैशातून व्ही-स्टार क्रिएशन सुरू केले. त्यांनी केरळमध्ये हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांचे पती कोचौसेफ थॉमस हे चित्तीलापिल्लई मॅग्नेट आणि व्ही-गार्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. यानंतरही शीला कोचौसेफ यांनी स्वत: V-स्टार क्रिएशन सुरू केले. भाड्याच्या जागेवर सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज 125 कोटी रुपयांच्या मोठ्या व्यवसायात बदलला आहे. व्ही-स्टार क्रिएशनच्या संस्थापक आणि एमडी, केरळच्या असलेल्या शीला के या देखील एक व्यावसायिक होत्या. ज्याने वडिलांच्या निधनानंतर कष्ट केले. ती लहानपणापासूनच ड्रेस मेकिंग करायच्या. त्यांच्या या प्रतिभेने त्यांना यश मिळवून दिले आणि ते अव्वल उद्योगपतींपैकी एक बनल्या आहेत.


1995 मध्ये शीला कोचौसेफ यांनी केली होती 20 लाखांची गुंतवणूक


शीला कोचौसेफ चित्तीलापिल्लई यांना त्यांच्या पतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन भाड्याने जागा घेऊन त्यावर  व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी सर्वप्रथम व्ही-स्टार सलवार कमीजपासून व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर हळूहळू  त्यामध्ये बदल करत त्यांनी व्यवस्याचा व्याप मोठा वाढवला आहे.1995 मध्ये शीला कोचौसेफ यांनी 20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने V-Star Creation सुरू केले. सुरुवातीला केवळ दहा कर्मचाऱ्यांसह त्यांनी काम सुरू केले. त्यामुळं त्यांना मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. पण तरीही शीला यांनी वळून बघितलं नाही.


महत्वाच्या बातम्या:


दरमहा फक्त 55 रुपये भरा, महिन्याला 3000 रुपये मिळवा; शेतकऱ्यांसाठी 'ही' आहे खास योजना