Vaibhav Naik Security : कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे. राणे आणि ठाकरे (narayan rane vs uddhav thackeray) समर्थकांमध्ये चिपळूणमध्ये शुक्रवारी राडा झाला. आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यलयाबाहेर राणे समर्थक आणि ठाकरे (uddhav thackeray) समर्थक भिडले होते. या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू नयेत म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. कार्यालय आणि घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. राणे ज्या पध्दतीने उत्तर देतील त्याचं पध्दतीने उत्तर देऊ असं वैभव नाईकांनी (Vaibhav Naik) प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणातील राजकीय वातावरणाकडे राज्याचं लक्ष असेल.
वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ -
रत्नागिरीतील गुहागरमध्ये झालेल्या शुक्रवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. वैभव नाईक यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. गुहागरमधील भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कालच्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू नये, म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन नाईक यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेनंतर जे वातावरण निर्माण झालं होतं, त्या अनुषंगाने पोलिसांनी वैभव नाईक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
जशास तस उत्तर देऊ - वैभव नाईकांचा हल्लाबोल
शुक्रवारच्या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त वाढवला असेल मात्र त्याची गरज नाही. शिवसैनिक जिल्यातील दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत. राणे ज्या पध्दतीने उत्तर देतील त्याचं पध्दतीने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईकांनी दिली आहे. नारायण राणेंना जसं उद्धव ठाकरेवर टीका करण्यासाठी भाजपने ठेवलं आहे, तसचं भास्कर जाधवांवर टीका करण्यासाठी निलेश राणेंना भाजपने सोडलेलं हे पिल्लु आहे. भाजपचा सुसंकृतपणा यातून समोर येत आहे. अशा लोकांमुळे भाजप यापुढच्या काळात रसातळाला जाईल, अशी टीका वैभव नाईक यांनी केली. भाजपच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतली असेल तर भाजप महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार ? असा प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा :
Exclusive : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ, प्राचीन मंदिरांसह जैव विविधता धोक्यात