Success story : IIT उत्तीर्ण झालेल्या एका तरुणाने (IIT pass out youth) सरकारी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशातील (Odisha) सुंदरगढ जिल्ह्यातील टंगरपाली ब्लॉकमधील रतनपूर येथील तरुण शेतकरी  हिरोद पटेल असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  हिरोदला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. तो वडिलांनाही आपल्या शेतीत मदत करत असे. यातून त्यांनी शेतीचे तंत्र शिकून घेतले. यानंतर हेरोदने शेती सुरू केली.  


वडिलांच्या निवृत्तीनंतर हिरोद पटेल यांनी स्वतःच्या एक एकर जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. हिरोद पटेल यांनी लहानपणापासूनच शेतीची आवड होती. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सरकारी नोकरी निवडण्याऐवजी शेतीची निवड केली. हिरोद पटेल असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो एका निवृत्त लष्करी जवानाचा मुलगा आहे. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हिरोद यांनी सरकारी नोकरीऐवजी शेतीची निवड केली. यातून आज हिरोद स्वावलंबी झाला आहे. शेतीच्या माध्यमातून ते त्यांच्या परिसरातील अनेकांना रोजगारही देत ​​आहेत. तसेच, त्यांना शेतीतून वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.


शेतात विविध प्रकारच्या भाज्या, केळी, आंबा, पेरु, सफरचंद


वडिलांच्या निवृत्तीनंतर हिरोद पटेल यांनी स्वतःच्या एक एकर जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. हिरोदला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. तो लहानपणापासून घरातच शेती पाहत असे. त्यानेही वडिलांना साथ दिली. यातून त्यांनी शेतीचे तंत्र शिकून घेतले. यानंतर हिरोदने शेती करण्यास सुरुवात केली. शेतीच्या क्षेत्रात आपले काम वाढवले. आज त्यांच्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या, केळी, आंबा, पेरु आणि थायलंड सफरचंद बेरीची झाडे आहेत. यातून दरवर्षी चांगले उत्पादन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या एकात्मिक शेतीतून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते, असा दावा त्यांनी केला.


मत्स्यपालनही केलं सुरु 


हिरोदने केवळ भाजीपाला आणि फळे लागवडीपुरते मर्यादित ठेवले नाही. तर त्यांनी मत्स्यपालन सुरू केले आणि त्यात यश मिळवले. त्यांनी आपल्या शेतात तीन तलाव बांधून त्यात मत्स्यपालन सुरु केले. अल्पावधीतच त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. हिरोदच्या एकात्मिक शेती तंत्रामुळे त्यांच्या गावातील काही तरुणांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रजातींची केळी पिकवण्याची माहितीही घेतली. त्यानंतर त्यांनी उद्यान विभाग आणि पाणलोट विभागाकडून मिळालेल्या निधीतून त्यांच्या जमिनीवर तलाव खोदून घेतले.


भाजीपाला शेतीतून चांगले उत्पन्न 


मी भातशेती केली तर मी वर्षाला 25000 रुपये किंवा 30000 रुपये कमवू शकतो असे हिरोदने सांगितले. पण, त्याच एक एकर जमिनीवर भाजीपाला, फळे आणि फुलांची लागवड करुन मी वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये कमवतो. बेरोजगार तरुणांनी शेतीला करिअर म्हणून निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शेती क्षेत्रात करिअरसाठी चांगली संधी आहे. सुरुवातीला अडचणी आल्या, पण जेव्हा तुम्हाला शेतीबद्दल सर्व काही कळू लागते, तेव्हा गोष्टी सोप्या होतात. शेतीच्या कामात फलोत्पादन अधिकारी आणि मृदसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना खूप सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या:


दिल्ली विद्यापीठामधून उत्तीर्ण, नोकरीऐवजी शेती करण्याचा तरुणीचा निर्णय, आज वर्षाला कमावतेय 45 लाख