एक्स्प्लोर

मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्यानं केली क्रांती, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोड मॉडेल

अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत.

Success Story : अलिकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्याने मसाला शेतीतून क्रांती केली आहे. विदर्भातील कोरडवाहू पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी मसाला शेतीमधून प्रगती साधली आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि अधिक नफा या तत्त्वावर आधारित केलेली मसाला शेती आज त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेली आहे.  दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक रो़ मॉडेल तयार केलं आहे. 

मुझफ्फर हुसैन यांनी पारंपारिक पिकांची शेती करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आणि शाश्वत मूल्यवर्धित मसाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी काळी मिरी, हळद, काळे आलं, काजू, तमालपत्र, कोकम, जायफळ, दालचिनी, इलायची यांसारख्या महागड्या पिकांची लागवड केली आहे. त्यातून ते चांगला नफा मिळवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या सहाय्याने त्यांनी मसाला शेतीचा एक यशस्वी प्रयोग राबवला आहे. ते  आज विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  • शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी आपल्या शेतात आधुनिक आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाचा समतोल साधला आहे. 
  • ड्रिप इरिगेशन तंत्राद्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर देऊन सेंद्रिय शेती केली आहे. 
  • रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर बहुपीक पद्धती (मल्टी-क्रॉपिंग) चा अवलंब करून जमिनीची सुपीकता टिकवली आणि उत्पादन क्षमता वाढवली.
  • स्मार्ट तंत्रज्ञान वापरून हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक पद्धतीत आवश्यक सुधारणा केली.
  • जलसंधारण तंत्रज्ञान, नैसर्गिक कीड नियंत्रण आणि मल्चिंग यांसारख्या तंत्रांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी मसाला शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवली 

कोणकोणत्या पिकांची केली लागवड?

अन्नधान्ये पीके : ज्वारी, मका, बाजरी, चारा, गहू, भाजीपाला मसाल्याचे व फळझाडे : आलं, हळद, वेलदोडा (वार्षिक पीक), काजू, दालचिनी, कोकम, काळी मिरी, चिंच, ऊस, आंबा, सिताफळ, संत्रा, मोसंबी. ५ वर्षांनंतर वार्षिक उत्पन्न देणारी पिके : जॅकफ्रूट (फणस). ३ वर्षांनी वार्षिक उत्पादन देणारी पिके : काजू, बांबू. लाकूड देणारी झाडे - सिल्व्हर ओक, महोगनी, जॅकफ्रूट

शेतमालाचि विक्री प्रक्रिया कशी आहे?

आंबा, सिताफळ, संत्रा आणि मोसंबी हे थेट मार्केटमध्ये विक्री केले जाते. काजू मल्टिप्लिकेशन, केसर मल्टिप्लिकेशन, काळी मिरी रोपांचे उत्पादन यांच्या शेतावर केले जाते. यासोबतच 3 प्रकारच्या हळदीची देखील पावडर आणि काळ्या आल्याची पावडर बनवून त्याचे पॅकेजिंग व कॅप्सूल उत्पादन केले जातचे. शेतमाल, प्रकिया केलेले पदार्थ विक्री करून ते वर्षाकाठी लाखोंची कमाई करतात. 

मसाला शेतीमुळं पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा

शेतकऱ्याने दिलेल्या माहितीमुळं मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत आहे. अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात. यात जैविक खतांचा वापर, योग्य पीक निवड, कीड नियंत्रण, मल्चिंग, जलसंधारण आणि विपणन यासंबंधी मार्गदर्शन दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून अनेक शेतकरी मसाला शेतीकडे वळताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget