Success Story: शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. बिहारमधील अशाच एका शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवडीचा (strawberry farming) यशस्वी प्रयोग केला आहे. ब्रिजकिशोर असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते बिहारमधील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आहेत. ते एकेकाळी हरियाणात मजूर म्हणून काम करायचे, स्ट्रॉबेरीची शेती करुन ते करोडपती झाले आहेत. पाहुयात त्यांची यशोगाथा. 


ब्रिजकिशोर हे शेतकरी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून वर्षाला 70 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहेत. त्यामुळे त्यांची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले शेतकरी ब्रिजकिशोर मेहता यांनी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मोठा नफा कमावला आहे. बिहारमधील बहुतेक कुटुंबांची गोष्ट अशी आहे की जेव्हा घरातील मोठ्या किंवा लहान मुलाला त्याच्या जबाबदाऱ्या कळतात, तेव्हा त्याआधी तो घराच्या गरजा भागवण्यासाठी स्थलांतरित होतो. देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आणि मोठ्या शहरांमध्ये आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी लोक दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यांमध्ये स्थलांतर करतात. हा ट्रेंड आजही कायम आहे. ब्रिजकिशोर मेहता यांनीही असेच काहीसे केले होते. सुमारे दहा वर्षापूर्वी ते हरियाणातील हिस्सार येथे रोजगाराच्या निमित्ताने उदरनिर्वाहासाठी गेले होते. पण तो फार काळ तिथं त्यांनी काम केलं नाही. तेथूनच एका परदेशी फळाची लागवड शिकले. ज्यामुळे ते श्रीमंत झाला. आज त्याची कमाई सुमारे एक कोटी रुपये आहे. 


स्ट्रॉबेरीच्या शेतीनं नशीब बदलले


आज शेतीच्या माध्यमातून नशीब बदलण्यासोबतच ते दहाहून अधिक शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे. बिहारमध्ये गेल्या दहा वर्षात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या आणि लहान प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. एकेकाळी आपल्या जमिनीत भात, गहू आणि इतर पिके घेऊन आपल्या घरच्या मूलभूत गरजा भागवता न येणारा ब्रिजकिशोर आज स्ट्रॉबेरीच्या शेतीला चांगले उत्पन्न मिळवण्याचा उत्तम पर्याय मानतो. या शेतीमुळं आज कुटुंबातील सर्व सदस्य शिक्षित आहेत आणि घर भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे.


हरियाणातून 60 रोपे आणून सुरुवात 


आज डोंगराच्या कुशीत वसलेल्या चिलखी बिघा या ब्रिजकिशोर गावात 40 शेतकरी स्ट्रॉबेरीच्या लागवडीत गुंतलेले आहेत. पण त्यांनी पहिल्यांदा हरियाणातून रोपे आणली, तेव्हा त्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. शेतकऱ्याशी संवाद साधताना ब्रिजकिशोर सांगतात की, गावात फक्त 60 रोपे घेऊन आलो होतो. शेती करायला सुरुवात केली. आज त्यांनी 10 एकरात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ते एका वर्षात सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या स्ट्रॉबेरीची विक्री करतात. 10 एकर शेतीसाठी 70 लाख रुपये खर्च येतो. अशा प्रकारे स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून त्यांना वर्षभरात 70 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शेतीला दिली भेट 


राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ब्रिजकिशोर मेहता यांच्या शेतात आले होते. तेव्हा ब्रिज किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश यांना राज्यात पॅक हाऊस आणि स्ट्रॉबेरी प्लांट्स उपलब्ध नसल्याबद्दल सांगितले होते. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी बिहारसह इतर राज्यांमध्ये जातात, त्यापैकी सुमारे 70 टक्के माल फक्त कोलकातामध्ये निर्यात केला जातो. एकेकाळी हरियाणात नोकरीसाठी गेलेल्या ब्रिजकिशोरच्या ठिकाणी आज सुमारे 200 लोक काम करत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्याचं धाडस! भाड्याची जमिन घेऊन फुलवला 'स्ट्रॉबेरीचा मळा', वर्षाला मिळवतोय एवढ्या लाखांचा नफा