Narayan Rane On Uddhav Thackeray : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध राणे कुटुंब (Rane Family) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा करत राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे' असे म्हणत नारायणे राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेच तुम्ही नाव का काढता, बेअक्कल माणूस आहे. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते याचा त्याला ज्ञान आहे का?, त्यामुळे तुम्ही त्याचं नाव घेत अपशकुन करत जाऊ नका असं नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. तसेच, त्याला हवे त्या भाषेत मी प्रत्युत्तर देईल. त्याला माझी सर्व क्षमता माहित असून, तो माझ्यासमोर येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला काय बघायचं. तो काही माझा स्पर्धक नाही. मी केंद्रीय मंत्री आहे, असे नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे वेडसर आहे...
फडणवीस मनोरुग्ण असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतांना नारायण राणे म्हणाले की, “मनोरुग्ण उद्धव ठाकरे आहे. मनोरुग्ण नाही तर वेडसर आहे तो, काहीही बोलत असतो, असे राणे म्हणाले.
ठाकरेंना चेक दिले हे वास्तव आहे...
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून, उद्धव ठाकरे यांना आपण मंत्रिपद देण्यासाठी एक कोटीचा चेक दिला होता असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, हा गौप्यस्फोट नसून वास्तव आहे. जे काही खोटा नसतो, तुम्ही जाऊन तपासा आणि चॅलेंज करा, असे नारायण राणे म्हणाले.
वागळेंची गाडी फोडली नसून, त्यांना चोपले आहे...
दरम्यान पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलतांना नारायण राणे म्हणाले की, “निखील वागळे यांची गाडी फोडली नाही, त्याला चोप दिला आहे. त्यामुळे फोडली म्हणू नका चोप दिला म्हणा, असे काम केल्यावर असेच होणार. बाकीच्याची पण तीच दशा होईल, असे नारायण राणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
राजकीय पातळी घसरली, नेत्यांकडून एकमेकांना कुत्र्यांची उपमा; पाहा कोण काय म्हणालं?