Budget 2024 Stocks: केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प येत्या 23 जुलै रोजी सादर करणार आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात नेमकं कोणत्या क्षेत्राला प्राधान्य मिळणार, याचे आपापल्या पद्धतीने अंदाज बांधले जात आहेत. याच अंदाजानुसार शेअर बाजारात गुंतवणूक केली जात आहे. परिणामी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही शेअर्समध्ये चांगलीच तेजी दिसेल, तर काही शेअर्सचे मूल्य घसरेल. दरम्यान, मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.  


ICICI बँक: मनीकंट्रोलच्या या अर्थविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार मोतीलाल ओस्वालने आयसीआयसीय बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स खरेदी करताना टार्गेट प्राईज 1,350 ठेवावे असे सांगितले आहे. सध्या हा शेअर 1260 रुपयांवर ट्रेड करतोय. 


HCL Tech: मोतीलाल ओस्वालने एचसीएल या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी टार्गेट प्राईज 1,710 रुपये ठेवायला हवे, असे मोतीलाल ओस्वालने म्हटलंय. 


कोल इंडिया: कोल इंडिया हा शेअरसुद्धा चांगले रिटर्न्स देऊ शकतो, असे मोतीलाल ओस्वालचे मत आहे. हा शेअर घेत असाल तर टार्गेट प्राईज 550 रुपये ठेवायला हवी.  सध्या हा शेअर 512 रुपयांवर आहे. मोतीलाल ओस्वालने धातू आणि खाणकाम उद्योगांत कोल इंडियाला सर्वाधिक पसंती दिली आहे.  


एसबीआय: मोतीलाल ओस्वालने एसबीआयमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 1,015 रुपयांचे टार्गेट ठेवावे असे सांगितले आहे. आगामी काळात हा शेअर 19.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता मोतीलाल ओस्वालने व्यक्त केली आहे.  सध्या हा शेअर 880 रुपयांवर आहे. 


एल अँड टी: एल अँड टी कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर 4,150 टार्गेट ठेवायला हवे. सध्या हा शेअर 3627 रुपयांवर आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा: मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेजने  महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी 3,300 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे असेही मोतीलाल ओस्वालने म्हटलंय. 


मॅनकाइंड फार्मा: ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने मॅनकाईंड फार्मामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून त्यासाठी 2,650 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे म्हटले आहे. आगामी काळात तो 23 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दाखवू शकतो. 

चोला इन्व्हेस्ट: मोतीलाल ओस्वालने चोला इन्व्हेस्ट या कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगत 1,660 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या या शेअरच्या मूल्यानुसार सुचवलेले हे टार्गेट 17 टक्के आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


SIP की PPF दोन्हीपैकी कोण सर्वोत्तम? जाणून घ्या गुंतवणुकीचा सर्वांधिक चांगला पर्याय कोणता?


फॉर्म-16 ते टीडीएस, आयटीआर भरण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज? जाणून घ्या सविस्तर....


आता झोमॅटो, स्विगीवरून खाद्यपदार्थ मागवणं महागणार, चार्जेसमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!