Chaturmas 2024 : हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. हा महिना विष्णू देवाला समर्पित आहे. पंचांगानुसार, चातुर्मास आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून सुरू होतो. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी असणार आहे, या दिवसापासून चातुर्मासही सुरू होणार आहे. 12 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीला चातुर्मास संपेल. यंदा चातुर्मासाचा काळ काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. नेमक्या कोणत्या राशींना चातुर्मासात फायदा होणार? जाणून घेऊया. 


मिथुन रास (Gemini)


येणारे चार महिने मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायी ठरतील. तुम्हाला नोकरी-व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नशिबाची साथ मिळाल्याने तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल. लव्ह लाईफमध्ये गोडवा वाढेल. करिअरमध्ये उंची गाठाल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी चातुर्मासातील चार महिने खूप शुभ ठरतील. कर्क राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाचा 4 महिन्यांचा काळ सुखाचा असेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. तुमचं उत्पन्न वाढेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुखाचा काळ सुरू होईल. चातुर्मासाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.  उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांना चातुर्मासात जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत येणारे अडथळे दूर होतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. व्यवसायाचा विस्तार होईल.


चातुर्मास सुरू होण्याआधी करुन घ्या 'ही' शुभ कार्य


पंचांगानुसार, 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशी ते देवउठनी एकादशीपर्यंत, म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास असणार आहे. या दरम्यानच्या काळात देव निद्रावस्थेत जातात. त्यामुळे ही चार महिने विवाह सोहळा, साखरपुडा, मुलांचं नामकरण आणि गृहप्रवेशासारखे शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं. देवउठवनी एकादशीनंतरच या शुभ कार्यांना सुरुवात होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला जुळून आले अनेक शुभ योग; 'या' राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, पांडुरंगाच्या कृपेने आर्थिक स्थिती उंचावणार