मुंबई : आपल्याजवळ असलेल्या पैशांचे मूल्य आणखी वाढवे, यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणूक करतो. कोणी शेअर बाजारात पैसे गुंतवतं तर कोणी पीपीएफ आणि एसआयपीच्या मदतीने मुच्यूअल फंडात पैसे गुंतवतं. शेअर बाजाराच्या तुलनेत पीपीएफ आणि एसआयपी हा सुरक्षित पर्याय समजला जातो. पण पीपीएफ आणि एसआयपी या दोन पर्यायांपैकीही गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय कोणता आहे? दोन पर्यायांपैकी सुरक्षित गुंतवणूक कशात केली जाऊ शकते? असे विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय सर्वाधिक योग्य आणि सुरक्षित आहे, हे समजून घेऊ या... 


रिस्क आणि रिटर्न्स 


गुंतणूक करताना गुंतवणुकीवरील रिस्क आणि गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. आजघडीला एसआयपी (म्यूच्यूअल फंड) हा असा पर्याय आहे, ज्याच्या माध्यमातून आज सर्वाधिक रिटर्न्स मिळतात. मात्र एसआयपीत केलेली गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. तर पीपीएफ हा पर्याय तुलनेने कमी जोखमीचा असतो. तसेच ही गुंतवणूक जोखमीच्या अधीन नसते. पीपीएफमध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर ठरवून दिलेला परतावा दिला जातो. 


गुंतवणुकीची मुदत आणि पैसे काढण्याची सोय  


एसआयपीमध्ये काळ आणि वेळेनुसार तुमच्या सोईनुसार बदल करता येतो. तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर तुम्ही त्यानुसार एसआयपी करू शकता. गरजेनुसार एसआयपीच्या रकमेत बदलही केला जाऊ शकतो. तर पीपीएफमध्ये तुम्हाला कमीत कमी 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यावर तुम्हाला पीपीएफमध्येही चांगला परतावा मिळतो. 


एसआयपीत गुंतवलेले पैसे आप्तकालीन स्थिती काढता येतात. तसेच निश्चित केलेल्या कालावधीच्या अगोदर हे पैसे काढता येतात. पण पीपीएफच्या बाबतीत तसे नाही. ठरवलेल्या मुदतीच्या अगोदर तुम्हाला पीपीएफ खात्यातून पैसे काढता येत नाहीत. 


एसआयपीतून कसा होऊ शकतो अधिक फायदा?


एसआयपी आणि पीपीएफ या गुंतवणुकीच्या दोन्ही पर्यायांचे आपापले फायदे आहेत. ज्यांना कोणतीही जोखीम न पत्करता गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. तर ज्यांची थोडीफार जोखीम पत्करायची तयारी आहे, ते एसआयपीच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला म्युच्यूअल फंडातून चांगले रिटर्न्स हवे असतील तर एसआयपी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ही एसआयपी दरवर्षी वाढवायला हवी, असेही सांगितले जाते. एसआयपीमध्ये दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ केल्यास तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. एसआयपीच्या मदतीने भविष्यात वाढणारी महागाई, दरवाढ आदी आव्हानांना तोंड देता येते.  


हेही वाचा :


आयटीआर भरताना येतायत अडचणी, ITR फायलिंगची शेवटची तारीख वाढणार?


बाईक चालवताय? 'ही' पाच कागदपत्रं सोबत असायलाच हवीत, अन्यथा होऊ शकते अडचण!


मोठी बातमी! 'या' एका कंपनीसाठी गुगल मोजणार अब्जो डॉलर्स, लवकरच होणार सर्वांत मोठा करार