मुंबई : तुम्ही या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करणार असाल तर तुमच्यासमोर फायनॅन्शियल इअर आणि असेसमेंट इअर (Financial Year And Assessment Year ) या दोन संज्ञा येतील. या दोन्ही संज्ञा समोर आल्या की अनेकजण गोंधळात अडकतात. या संज्ञांची माहिती नसल्यामुळे त्यांना आयटीआर भरण्यासाठी अडचण येते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर या दोन्ही संज्ञा काय आहेत? त्यांचा आयटीआर भरताना काय उपयोग होतो? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या...
फायनॅन्शियल इअर म्हणजे काय? (What is Financial Year)
फायनॅन्शियल इअरला संक्षिप्त स्वरुपात FY आणि असेसमेंट इअरला AY असे म्हटले जाते. एका वर्षाचा असा काळ ज्यात तुम्ही अर्थार्जन करता, त्याला फायनॅन्शियल इअर म्हटले जाते. केंद्र आणि वेगवेगळ्या राज्य सरकारमार्फत सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा आर्थिक वर्षाला समोर ठेवूनच सादर केला जातो. प्रत्येक आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलापासून चालू होते आणि 31 मे रोजी संपते. त्या हिशोबाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीला आर्थिक वर्ष 2023-24 म्हणता येईल. अग्रीम कर (Advance Tax) आणि उद्गम कर (TDS) हे आर्थिक वर्षाचा संदर्भ समोर ठेवूनच भरले जातात. कमाईचा अंदाज घेऊनच हे दोन्ही कर तुम्हाला भरावे लागतात. त्यामुळे नेमका किती कर द्यायचा आहे हे असेसमेंट इअरमध्येच समजते.
असेसमेंट इअर म्हणजे काय? (What is Assessment Year)
वित्त वर्ष संपल्यानंतर लगेच असेसमेंट वर्ष चालू होते. आर्थिक वर्षात झालेल्या कमाईवर किती कर लागणार, हे असेसमेंट इअरमध्ये ठरवले जाते. असेसमेंट इअरमध्येच आपण आयटीआर फाईल करतो. उदाहरणार्थ 2023-24 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालवधीत होते. या आर्थिक वर्षासाठी असेसमेंट इअर हे 1 एप्रिल 2024 पासून चालू झालेले आहे. गेल्या आर्थिक वर्षातीत किती कर भरावा लागणार हे असेसमेंट इअरमध्ये ठरवले जाते. त्यानुसार तुम्हाला इन्कम ट्रक्स रिटर्न भरावा लागतो. यावेळी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 आहे.
हेही वाचा :
शेअरचे मूल्य 2 रुपयांपेक्षा कमी, पण एका आठवड्यात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीचा जलवा
Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!