Stock Market Opening : आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सह निफ्टीही घसरला. बाजारात मंद सुरुवाता पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय बाजारेपेठेवर होताना दिसत आहे. यामुळेच शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळतेय.


आज शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स 96.60 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 59,235.98 अंकांवर होता. तर बाजार उघडताच सुरुवातीला निफ्टीही साधारण व्यवहार करत होता, मात्र काही वेळानं निफ्टी 22 अंकांनी घसरला.


आज कमाई करणारे शेअर्स


सेन्सेक्समध्ये आज टाटा स्टील, पावर ग्रीड, एसबीआय (SBI), ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि गॅस या शेअर्सची घोडदौड सुरु आहे. हे शेअर्स बाजार उघताच कमाई करताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त इतर शेअर्सची घसरण सुरुच आहे. हेल्थ केअर संबंधित शेअर्समध्ये 0.70 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. तर आयटी क्षेत्रातही शेअर्समध्ये 0.65 टक्क्यांनी घसरण झाली आहे. फार्मा सेक्टरलाही घरघर लागली आहे.


आज तोट्यात असलेले शेअर्स


सेन्सेक्समध्ये आज रिलायंस इंडस्ट्री, एलअँडटी, डॉ, रेड्डीज लॅब, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, बजाज फायनांस, एचसीएल टेक, आयटीसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बॅक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, विप्रो, इंफोसिस आणि सन फार्माच्या शेअर्शमध्ये घसरण झाल्याचं दिसत आहे.


सेक्टोरियल इंडेक्सची परिस्थिती काय?


आज निफ्टीच्या सेक्टोरियल इंडेक्समध्ये मेटल, पीएसयू बँक, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि गॅस सेक्टर नफ्यामध्ये आहेत. याशिवाय, इतर सर्व क्षेत्रांमध्ये घसरणीचं चिन्ह आहे. हेल्थकेअर इंडेक्स 0.70 टक्के, आयटी शेअर्स 0.65 टक्के आणि फार्मा स्टॉक्स 0.55 टक्क्यांनी घसरले आहेत.


प्री-ओपनिंगमधील बाजाराची परिस्थिती


आजच्या प्री-ओपनिंग ट्रेडमध्ये, बीएसई सेन्सेक्स 138 अंकांनी घसरून 59179.47 च्या पातळीवर होता आणि एनएसईचा निफ्टी 61.40 अंकांनी घसरून 17597.60 वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, SGX निफ्टी 5.50 अंकांनी म्हणजेच जवळपास सपाट होऊन 17694 च्या पातळीवर व्यवहार करत होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या