Stock Market Opening: आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवर झाला आहे. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरुन 71 हजारांवर आला आहे. तर  निफ्टीमध्ये 200 अंकांची घसरण  झाली आहे. काल अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली होती. अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम आयटी समभागांवर झाला असून हे क्षेत्र 2 टक्क्यांनी घसरले आहे.


BSE सेन्सेक्स 519.94 अंकांच्या किंवा 0.73 टक्क्यांच्या घसरणीसह 71,035 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 165.10 अंकांच्या किंवा 0.76 टक्क्यांच्या घसरणीसह 21,578 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच निफ्टी 180 अंकांनी घसरला होता आणि सेन्सेक्सने लगेचच 71,000 ची पातळी तोडली होती. 


बाजारातील घसरणीचे मुख्य मुद्दे


ॲडव्हान्स-डिक्लाइन रेशोमध्ये, NSE चे 281 शेअर्स वधारत होते तर 1372 शेअर्समध्ये घट दिसून आली.
मिडकॅप निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 30 समभाग घसरणीच्या लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.
निफ्टीच्या 50 पैकी 46 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.
बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांत NSE निफ्टीमध्ये 200 अंकांची मोठी घसरण झाली आहे.


बाजार उघडल्यानंतर 15 मिनिटांत बँक निफ्टी सुमारे 600 अंकांनी घसरला आणि त्याने 45,000 ची महत्त्वाची पातळी मोडली. बँक निफ्टी सध्या 592 अंकांच्या घसरणीसह म्हणजेच 1.30 टक्क्यांच्या घसरणीसह 44910 च्या पातळीवर दिसत आहे. बँक निफ्टीच्या सर्व 12 समभागांवर घसरणीचे लाल चिन्ह प्रबळ आहे. आज सेन्सेक्स-निफ्टीचा सर्वाधिक तोटा विप्रो आहे. जो 2.50 टक्क्यांनी घसरला आहे. दोन्ही निर्देशांकांमध्ये आयटी समभाग सर्वाधिक घसरले आहेत. इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स आज सेन्सेक्स आणि निफ्टीचे सर्वात मोठे घसरलेले शेअर्स राहिले.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! टाटांच्या नावावर नवीन विक्रम, 30 लाख कोटींचं मार्केट कॅप गाठणारा देशातील पहिला व्यवसाय