Share Market : जागतिक शेअर बाजारातील भक्कम वातावरणामुळे बाजारात खरेदीचा जोर राहिला आहे. धातू, स्थावर मालमत्तांच्या समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्समध्ये 365 अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीतही 108 अंकांने उसळी मारली आहे. शेअर बाजारात कालची वाढ आजही कायम राहण्याचे संकेत आहेत. शेअर बाजाराला जागतिक संकेतांचाही आधार मिळाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात बीएसई सेन्सेक्स 61000 च्या जवळ उघडला आहे. 


आयटी कंपन्यांच्या स्टॉक्सवर सर्वांची नज आहे. टीसीएस, विप्रो, इन्फोसिसच्या तिमाहीचा अहवाल देखील घोषित होणार आहे. सध्या इन्फोसिसचे स्टॉक वधारलेत मात्र इतर दोन्हीमध्ये किंचित घसरण झाली आहे. टाटा टेलिसर्विसने देखील व्होडाफोन-आयडीयाच्या पावलावर पाऊल ठेवत सरकारला 9.5 टक्के हिस्सेदारी देऊ केली आहे. त्यानंतर 5 टक्क्यांनी टाटा टेलिसर्विसेसचे शेअर्स घसरले आहेत. काल धातूच्या कंपन्यांचे स्टॉक्स घसरल्यानंतर आज तेजीत बघायला मिळत आहेत. हिंडाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. कोल इंडिया आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये देखील उसळी मारल्याचे चित्र दिसत आहे.





आजच्या व्यवहारात एनएसई (NSE)चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 114 अंकांच्या वाढीसह 18170 वर उघडला. त्याच वेळी, बीएसई सेन्सेक्स 373.22 अंकासह म्हणजे 0.62 टक्क्यांच्या वाढीसह 60,990 वर व्यापार करत आहे. जर आपण निफ्टीच्या शेअर्सची स्थिती पाहिली तर आज 50 पैकी 45 समभाग तेजीसह व्यवहार करत आहेत. केवळ 5 समभाग घसरणीच्या निम्न चिन्हावर व्यवहार करताना दिसत आहेत. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर, 298.35 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी वाढून 38,720 च्या पातळीवर व्यापार होत आहे. आज हिंडाल्को इंडस्ट्रीज 2.3 टक्क्यांनी आणि टाटा स्टील 1.67 टक्क्यांनी वर आहे. JSW स्टील 1.34 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. एनटीपीसी 1.21 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. कोटक बँक 1.17 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: