Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. तर, यावेळी महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. 


राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मांडल्या जाणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याच्या प्रस्तावाची चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. केवळ दंड माफ करण्याचा प्रस्ताव नाही, तर या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही मंत्रिमंडळ बैठकीतून महापालिकेला देण्यात येणार असल्याचं कळतंय. तसं झालं तर एका आमदारासाठी मंत्रिमंडळात, असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यताही आहे. 


दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातल्या कोरोना स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच उद्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांच्या करमाफीच्या निर्णयाला मंजूरी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय आजच्या बैठकीत स्कूल बस चालकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्कूल बस मालकांनाही लॉकडाऊन काळातील वार्षिक वाहन करात 100 टक्के सवलत मिळण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह