Stock Market Closing: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत सुरू झाला. मात्र दिवसाअंती बाजारात पडझड पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 100.42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 53,134.35 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक 24.50 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या किंचित घसरणीनंतर 15,810.85 च्या पातळीवर बंद झाला आहे.


सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्सच्या लिस्टमध्ये 19 स्टोकमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी दिवसाअंती 11 स्टोकमध्ये वाढ देखील झाली आहे. आज सर्वाधिक आयटीसीच्या शेअर्समध्ये पडझड झाली आहे. आयटीसीचे शेअर्स 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय आज पॉवर ग्रीडचा स्टोक 1.54 टक्क्यांनी वधारला आहे. आजचा टॉप गेनर स्टॉक पॉवर ग्रिड आहे.


कोणत्या कंपनीचे शेअर्स वधारले?


आज बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, रिलायन्स, टाटा स्टील, डॉ रेड्डीज, अल्ट्रा केमिकल, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.


कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले?


ज्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली त्यात ITC व्यतिरिक्त, विप्रो, अॅक्सिस बँक, M&M, मारुती, IndusInd Bank, LT, Asian Paints, HDFC, Infosys, TCS, कोटक बँक, NTPC, HDFC बँक, यासह अनेक कंपन्यांचे शेअर्सचा समावेश. 


सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आज बहुतांश सेक्टर्स लाल चिन्हावर बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारानंतर निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी हेल्थकेअर, फार्मा आणि मेटल सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. याशिवाय निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, मीडिया, पीएसयू बँक, खाजगी बँक, रिअॅल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल सेक्टरची ही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aadhaar Card Validity: आधार कार्डची वैधता किती दिवस? जाणून घ्या Expiry बाबत UIDAI चे खास नियम
Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला
Petrol-Diesel Price : आज पुन्हा कडाडलं कच्चं तेल; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरही परिणाम होणार?