Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारल आहे. आशियाई शेअर बाजारात सकारात्मक संकेत असल्याने बाजार वधारला. त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. प्री-ओपनिंग सत्रानंतर बाजारात तेजी कायम असल्याचे दिसून आले आहे.
शेअर बाजारातील बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला. तर निफ्टीने 15900 अंकांचा टप्पा ओलांडला. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 259 अंकांनी वधारत 53,494.03 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 84 अंकांनी वधारला असून 15,919.50 अंकांवर व्यवहार करत होता.
मंगळवारी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. चीन-अमेरिकेतील तणाव कमी करण्यासाठी सुरू असल्याच्या चर्चांनी बाजार वधारला. आर्थिक मंदी आणि वाढत्या महागाईच्या चिंतेचा परिणाम अजूनही बाजारावर दिसून येत आहे.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 0.49 टक्क्यांनी वाढ झाली असून स्मॉल कॅपममध्ये 0.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँक निफ्टीतही तेजी दिसत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 250 अंकांनी वधारला आहे.
आज फार्मा, ऑइल अॅण्ड गॅस, बँक, आयटी, मेटल आणि ग्राहकोपयोगी वस्तू आदींच्या शेअर दरात उसळण झाल्याचे दिसून येत आहे. तर, रियल्टीच्या शेअर दरात घसरण असल्याचे दिसून येत आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर दरात 2.09 टक्के, हिंदाल्को 2.03 टक्के आणि पॉवरग्रीडच्या शेअर दरात 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व्ह1.69 टक्के आणि एनटीपीसीच्या शेअर दरात 1.56 टक्क्यांनी तेजी आली आहे.
ब्रिटानियाच्या शेअर दरात 0.76 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. हीरो मोटोकॉर्पमध्ये 0.59 टक्क्यांनी घसरला आहे. तर, बजाज ऑटो 0.35 टक्क्यांनी वधारला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 0.31 टक्क्यांची घसरण दिसत आहे.