Stock Market Closing : आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार थोड्याशा घसरणीसह बंद झाला. आज बाजार सेन्सेक्स 94 आणि निफ्टी 15 अंकांच्या किंचित घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स 94 अंकांनी घसरून 55,675 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 15 अंकांनी घसरून 16,569 अंकांवर बंद झाला.


आज शेअर बाजारात फक्त बँकिंग, वाहन, धातू, तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये वाढ दिसली. तर दुसरीकडे, आयटी, एफएमसीजी, फार्मा, ऊर्जा, मीडियासह इतर सर्व क्षेत्रे घसरणीसह बंद झाली. निफ्टीच्या 50 शेअर्समधील 28 शेअरमध्ये आज घसरण झाली. तर 22 शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्सचे 30 शेअर्समधील नऊ शेअर्समध्ये वाढ झाली तर  21 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 


वाढ झालेले शेअर्स 
शेअर बाजारातील घसरणीनंतर अनेक शेअर्समध्ये वाढ झाली. यामध्ये टाटा स्टील 0.99 टक्के, इंडसइंड बँक 0.78 टक्के, महिंद्रा 0.77 टक्के, आयटीसी 0.70 टक्के, कोटक महिंद्रा 0.67 टक्के, इन्फोसिस 0.55 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.44 टक्के, एनटीपीसी 0.06 टक्के, मारुती सुझुकी 0.50 टक्के वधारत बंद झाले.


घसरण झालेले शेअर्स
अल्ट्राटेक सिमेंट 1.69 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.34 टक्के, नेले 1.01 टक्के, लार्सन 0.79 टक्के, अॅक्सिस बँक 0.68 टक्के, सन फार्मा 0.63 टक्के, डॉ. रेड्डी 0.59 टक्के, एचयूएल 0.59 टक्के. , विप्रो 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहेत.


दरम्यान, शेअर बाजार सुरू होतानाच आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. शेअर मार्केटमध्ये सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 158 अंकांनी घसरुन 55,610 वर उघडला तर निफ्टी 53.60 अंकांनी घसरुन 16,530 वर उघडला त्यामुळे आज शेअर बाजारात विक्रीचा जोर पाहायला मिळाला.


महत्वाच्या बातम्या


LIC Share Price : टेन्शन वाढलं, एलआयसीचा शेअर 800 रुपयांखाली; गुंतवणुकदारांना एक लाख कोटींचा फटका