BharatPe Ashneer Grover : कंपनीच्या अंतर्गत वादामुळे BharatPe गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारत पे या कंपनीचे (bharatpe) सह-संस्थापक आणि एमडी असणारे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांनी ऐच्छिक रजा म्हणजेच वॉलेंटरी लिव्ह घेतली आहे. काही रिपोर्ट्सनुसार माधुरी जैन ग्रोवर यांना नोकरीवरुन काढून टाकलेय. तसेच कंपनीतून काही जणांना नोकरीतून काढलेही आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या सर्व वादावर आता भारत पे कंपनीकडून स्पष्टीकरण आले आहे.  कुणालाही नोकरीवरुन काढून टाकलं नसल्याचे भारत पे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्रोवर दाम्पत्याचा वाद समोर आल्यानंतर भारत पे कंपनीने याप्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे. 


कंपनीने स्पष्टीकरणात काय म्हटलेय?
भारतपे कंपनीच्या बोर्डाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलेय. त्यात त्यांनी म्हटलेय की, सध्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकलेलं नाही. यासंदर्भात आलेले सर्व रिपोर्ट्स निराधार आणि असत्य आहेत. कंपनी स्वतंत्र आणि कसून चौकशी करण्यास वचनबद्ध आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही कारवाई केली नाही, आणि केली जाणारही नाही.  प्रसारमाध्यांना विनंती आहे की, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अथवा अहवाल येण्यापूर्वी अंदाज लावू नये. माहिती नसलेल्या स्त्रोतांच्या आधारे कोणत्याही बातम्या देऊ नये. 


काय आहे प्रकरण?
BharatPe कंपनीचे (bharatpe) सह-संस्थापक आणि एमडी असणारे अश्नीर ग्रोव्हर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली. अश्नीर ग्रोव्हर या व्हिडीओत कोटक वेल्थ मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्याला नायका कंपनीचे आयपीओचे शेअर्स का मिळाले नाहीत म्हणून धमकी देत होते. या प्रकरणानंतर 19 जानेवारी 2022 पासून मार्च अखेरपर्यंत अश्नीर ग्रोव्हर ऐच्छिक सुट्टीवर गेले होते. यावर कंपनीकडून स्पष्टीकरणही आले होते. कंपनीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, अश्नीर ग्रोव्हर यांच्या अनुपस्थितीत सीईओ सुहेल समीर व्यवसाय पाहतील. 'सध्यासाठी, कंपनीच्या बोर्डाने  अश्नीर यांचा निर्णय स्वीकारला आहे, कंपनी, कर्मचारी आणि गुंतवणूकदार तसेच आमच्या लाखो व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.  तसेच सुहेल समीर यांनी सांगितले, 'ऐच्छिक रजेच्या कालावधीत ग्रोव्हर कंपनीच्या दैनंदिन व्यवसायात सहभागी होणार नाहीत तसेच  या सुट्टीच्या काळात ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करतील.'