Rashmika Mandanna Crush : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडलेल्या आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. आता त्या अभिनेत्रींच्या यादीत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिचेही नाव जोडले जाणार आहे. रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तिच्यावर 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या तेगुलू चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव होतोय.


रश्मिका ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात आपला ठसा उमटवला आहे. तिच्या अभिनयातील अष्टपैलुत्व आणि तिच्या गोंडसपणामुळे रश्मिका आज लाखो लोकांच्या हृदयाचे ठोके बनली आहे. पण लाखो लोकांच्या हृदयात राहणार्‍या रश्मिकाच्या हृदयात कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही...? चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.


काही काळापूर्वी तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रश्मिकाने तिला कोणता दक्षिण भारतीय अभिनेता आवडतो हे सांगितले होते. तो अभिनेता आज दोन मुलांचा बाप जरी असला तरी तो तिचा क्रश असल्याचे रश्मिकाने उघडपणे व्यक्त केले होते. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ते स्वतःही दक्षिणेतील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मिकाचा क्रश आहे 'मास्टर' फेम थलपथी विजय (Master Actor Vijay thalapathy) याचा खुलासा रश्मिकाने एका मुलाखती दरम्यान केला होता.


आजकाल रश्मिका पुष्पा चित्रपटाबद्दल फार चर्चेत आहे. या चित्रपटात, रश्मिकाने अल्लू अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती जी नंतर त्याची पत्नी होते. सध्या पुष्पाचा पहिलाच भाग प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात सामंथाचाही एक कॅमिओ आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha